उपसभापती पदासाठी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या शेळकेंना काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण..

चार दिवसांपुर्वी अर्जून शेळके यांनी काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
congress-bjp clash news aurangabad.
congress-bjp clash news aurangabad.

औरंगाबाद ः पंचायत समिती उपसभापती पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्जून शेळके यांना काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी दालनातच चोप दिला. (Shelke, who left the party for BJP for the post of Deputy Speaker, was beaten by Congress workers.) चार दिवसांपुर्वीच अर्जून शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पंचायत समितीचे उपसभापती पद पटकावले होते. याचा राग काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनात होता, तो आज उफाळून आला.

दरम्यान, शेळके यांना मारहाण झाल्याचे समजताच भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचयात समितीमध्ये धाव घेतली. (Congress Aurangabad) फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार हरिभाऊ बागडे व काॅंग्रेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. (Bjp Mla Haribhau Bagde, Phulambri) राजकारणात एकमेकांना धोबीपछाड देण्याची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाही.

भाजपच्या ताब्यात असलेल्या दुध संघातील कारभाराबद्दल नाराजी आणि आरोप करत कल्याण काळे यांनी बागडे यांना नेहमीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर फुलंब्री मतदारसंघात काळे यांचे वर्चस्व असलेल्या संस्था ताब्यात घेण्यासाठी बागडे यांनी देखील साम, दाम, दंड, भेद या अस्त्रांचा वापर अनेकदा केल्याचे दिसून आले. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती असो की मग आता पंचायत समिती उपसभापती पदाची निवड असो.

चार दिवसांपुर्वी अर्जून शेळके यांनी काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. शेळके हे कल्याण काळे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. पण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पक्षाकडून डावलले जात असल्याचा आरोप करत त्यांनी नाराजीचा सूर लावला होता. पण त्यामागे भाजपकडून त्यांना मिळालेली पंचायत समिती उपसभापती पदाची आॅफर हे खरे कारण होते हे आता स्पष्ट झाले आहे.

शेळके यांनी विश्वासघात करत उपसभापती पद मिळवल्याचा आरोप काॅंग्रेसने त्यांच्या निवडीनंतर केला होता. शेळके यांनी पदासाठी पक्ष सोडल्याचा राग काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. शेळके यांना धडा शिकवण्याच्या हेतूने आज सकाळीच काॅंग्रेसचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते पंचयात समितीमध्ये आले होते. अर्जून शेळके हे आपल्या दालनात जाताच त्यांच्या पाठोपाठ या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दालनात प्रवेश करत त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला, दरम्यान शेळके यांना मारहाण झाल्याचे समजताच आमदार हरिभाऊ बागडे व भाजप पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेतली. या प्रकारामुंळे काॅंग्रेस-भाजप समर्थकांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता लक्षात घेता परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com