खतांच्या वाढत्या किंमतीसंदर्भातील पत्राची शरद पवारांकडून तासाभरातच दखल.. - Sharad Pawar's letter regarding rising fertilizer prices within an hour. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

खतांच्या वाढत्या किंमतीसंदर्भातील पत्राची शरद पवारांकडून तासाभरातच दखल..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 मे 2021

केंद्र सरकारने रासायानिक खतांच्या किंमती गोणी मागे ६०० ते ७०० रुपयांची वाढ केली आहे.

औरंगाबाद ः केंद्र सरकारने ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खंताच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली. कोरोनामुळे शेती मालाला भाव नाही, डिझेचच्या किंमती वाढल्याने ट्रॅक्टरने मशागतीची कामे परवडत नाही, अशा दुहेरी संकटात असतांना आता खत दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.(Sharad Pawar's letter regarding rising fertilizer prices within an hour.) रासायनिक खतांच्या किंमती कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवारांना दिले.

मुंबई येथे सिल्वर ओक या निवासस्थानी चव्हाण पवारांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. (Chavan handed over the letter to MP Supriya Sule.) तेव्हा चव्हाण यांनी हे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांना दिले. विशेष म्हणजे एका तासात शरद पवार यांनी या पत्राची दखल घेतली आणि केंद्रीय मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांना पत्र पाठवून खतांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात मागणी केली.

केंद्र सरकारने काही ग्रेडच्या खंताच्या दरांमध्ये प्रचंड वाढ केली आहे. औरंगाबाद येथे काल झालेल्या पालकममंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीतील खरिप आढावा बैठकीत देखील रासायनिक खंतांच्या वाढत्या किंमतीवर चर्चा झाली. (The rising cost of chemical fertilizers was also discussed at the kharif review meeting.) सर्वच पक्षांनी खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली. आमदार सतीश चव्हाण आज मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. 

परंतु काही कारणास्तव त्यांची भेट होऊ शकली नाही. तेव्हा खतांच्या किंमती संदर्भातील पत्र चव्हाण यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. विषय गंभीर असून मी तातडीने हे पत्र साहेबांना देते असे आश्वासन सुळे यांनी चव्हाण यांना दिले. (It is noteworthy that Supriya Sule discussed the letter with Sharad Pawar shortly after.) विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांची काही वेळातच शरद पवार यांच्यांशी पत्रा संदर्भात चर्चा केली. तासाभरातच पवारांनी सतीश चव्हाण यांच्या पत्राचा संदर्भ देत केंद्रीय रासायनिक खत विभागाचे मंत्री यांना पत्र लिहून तात्काळ दखळ घेण्यास सांगितले.

खरिप हंगाम तोंडावर आहे, शेतकरी मशागत व परेणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र अशातच केंद्र सरकारने रासायानिक खतांच्या किंमती गोणी मागे ६०० ते ७०० रुपयांची वाढ केली आहे. (Prices of chemical fertilizers go up by Rs 600 to Rs 700 per bag) या संदर्भात सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की,  १०:२६:२६ खताची ५० किलोची गोणी आधी ११७५ रूपयांना मिळत होती, त्यासाठी आता १७७५, डीएपी ११८५ ऐवजी आता १९०० रुपयांना मिळत आहे. या शिवाय अन्य खतांच्या किंमती देखील भरमसाठ वाढवण्यात आल्या आहेत.

दुष्काळात तेरावा महिना..

लाॅकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे, त्याच्या शेत मालाला भाव नाही, मशागतीची कामे ट्रॅक्टरने करायची तर डिझेलचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. अशा दृष्टचक्रात शेतकरी अडकलेला असतांना केंद्र सरकारने त्यांना अधिकच अडचणीत आणले आहे. एकीकडे पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मदत द्यायची, अन् दुसरीकडे खतांच्या दरात वाढ करून ते काढून घ्यायचे, असाच हा प्रकार दिसतो. मग या योजनेचा उपयोग काय? असा सवालही चव्हाण यांनी पत्रातून केला आहे.

खतांच्या दरवाढीचा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्याने पेरायचे काय आणि खायचे काय? हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे खतांच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे शिफारस करून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी देखील चव्हाण यांनी पवारांना दिलेल्या पत्रात केली आहे. 

हे ही वाचा : अजित पवार, जयंत पाटील आता तुम्ही हसतायं, पण..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख