‘मिशन झिरो औरंगाबाद' मोहिमेला शरद पवारांनी दाखवला झेंडा

धारावीच्या धर्तीवर शहरात घरोघरी जाऊन रुग्णांची स्क्रीनिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि कोरोनाचे निदान करून तो आटोक्यात आणण्याचे प्रयत्न या उपक्रमा अंतर्गत केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन स्क्रीनिंग करून संशयित व्यक्तीची जागेवरच अँटीजेन टेस्ट केली जात आहे. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णाची रवानगी केली जाते.
sharad pawar flag news
sharad pawar flag news

औरंगाबाद ः महापालिका आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन झिरो औरंगाबाद' या मोहिमेला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी झेंडा दाखवला. कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्युदर शून्यावर आणण्याकरिता धारावीच्या धर्तीवर भारतीय जैन संघटना व महानगरपालिकेच्या वतीने ‘मिशन झिरो-औरंगाबाद’ या उपक्रमाची सुरवात नुकतीच करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार आज शहरात आले होते. यावेळी सकाळी शरद पवार, पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या मोहिमेला झेंडा दाखवत या उपक्रमाचे कौतुक केले. 

भारतीय जैन संघटनेचे हे मिशन मुंबईतील धारावीत यशस्वी झाले. त्यानंतर हे मिशन औरंगाबादसह पुणे आणि नाशिकमध्येही सुरू करण्यात आले आहे. शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा नकारात्मक परिणाम व्यक्ती, कुटुंब, सोसायट्या, कॉलनी, वॉर्ड, शहर, उद्योग आणि व्यवसायांवरही होत आहे. आरोग्य आणि आर्थिक घडी पुन्हा बसविण्याकरिता शहर कोरोनामुक्त होण्याची आवश्यकता लक्षात घेता महापालिकेच्या सोबत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

धारावीच्या धर्तीवर शहरात घरोघरी जाऊन रुग्णांची स्क्रीनिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि कोरोनाचे निदान करून तो आटोक्यात आणण्याचे प्रयत्न या उपक्रमा अंतर्गत केले  जात आहेत.  पहिल्या टप्प्यात कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन स्क्रीनिंग करून संशयित व्यक्तीची जागेवरच अँटीजेन टेस्ट केली जात आहे. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णाची रवानगी केली जाते.

 मोहिमेचा शुभारंभ दहा मोबाईल डिस्पेंसरी व्हॅनने करण्यात आला. शहराच्या विविध भागात या व्हॅन  तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. यामध्ये महापालिकेचे डॉक्टर आणि आरोग्यसेवक अशा ६० जणांचा समावेश आहे.  या शिवाय १० चालक, २० स्वंयसेवक अशा एकूण ९० जणांची टीम या मिशन झिरो औरंगाबाद मोहिमेत सहभागी झाले आहेत. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन हे पथक नागरिकांची तपासणी करते.

आज मोबाईल व्हॅनची संख्या आणखी दहाने वाढवण्यात आली. त्यामुळे आता एकूण  २० मोबाईल डिस्पेंसरी व्हॅन सुरू  झाल्या आहेत.  याशिवाय कामाची व्याप्ती लक्षात घेता आरोग्यसेवक व स्वयंसेवकांची संख्या देखील दुप्पट करण्यात आली  आहे.  आज या नव्याने वाढ करण्यात आलेल्या दहा मोबाईल व्हॅनला शरद पवार, सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, महापालिकेचे प्रशासक आस्तीक कुमार पांडेय,माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी झेंडा दाखवून या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com