शरद पवार म्हणाले, सामान्यांच्या अडचणी समजून घ्या, त्या तातडीने सोडवा.. - Sharad Pawar said, understand the problems of common people, solve them immediately. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

शरद पवार म्हणाले, सामान्यांच्या अडचणी समजून घ्या, त्या तातडीने सोडवा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 मे 2021

पवार साहेबांवर गेल्या महिनाभरात दोन शस्त्रक्रिया झाल्या.  पण त्या काळात देखील त्यांनी राज्याच्या हित किंवा काळजी सोडली नाही.

औरंगाबाद ः मराठवाड्यातील कोरोनाची परिस्थिती, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करण्याच्या सूचना शरद पवार साहेबांनी मला दिल्या. ( Mla Satish Chvan Meet Ncp Leader Sharad Pawar at Mumbai)  वयाची ८० वर्ष पुर्ण झालेला हा नेता राज्याच्या काळजीसाठी किती धडपडतो हे आज पुन्हा जाणवले, अशा शब्दात मराठवाडा पदवीधरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी पवारांसोबत मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीचे वर्णन केले.

राज्यात मुंबई, पुण्यानंतर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्यांमध्ये जाणवतो आहे. वाढती रुग्ण संख्या, मृत्यू दर आणि आॅक्सिजन, रेमडेसिव्हर, बेडचा तुटवडा या परिस्थितीला देखील मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. ( Sharad Pawar gave Information Corona Pandamic situation in Marathwada)  या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडीत यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली.

या भेटी विषयी सांगतांना सतीश चव्हाण म्हणाले, आमच्याकडून  मराठवाड्यातील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. रुग्ण संख्या, मृत्यू दर आरोग्य सुविधा, उपाय योजना यासह अडीअडचणी याची इत्यंभूत माहिती घेतली. ही माहिती घेत असतांना त्यांच्या चेहऱ्यावर मराठवाड्याबद्दलचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि कोरोना सारख्या महामारीतली चिंता पदोपदी जाणवत होती.

पवार साहेबांवर गेल्या महिनाभरात दोन शस्त्रक्रिया झाल्या.  पण त्या काळात देखील त्यांनी राज्याच्या हित किंवा काळजी सोडली नाही. (Sharad Pawar is a sTrong Leadar Said Satish Chavan)  आज त्यांची भेट घेतली तेव्हा ज्या आस्थेवाईकपणे त्यांनी मराठवाड्यातील कोरोना परिस्थितीची माहिती जाणून घेतली त्यावरून ते कोरोना संकटात किती बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत हे दिसून आले.

कोरोना संकटात लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्या,  त्या तातडीने सोडवा, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्याचे सतीश चव्हाण यांनी सांगितले. ( Amarsingh Pandit Also with Mla satish Chavan in Meeting) या भेटीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर केलेले दौरे, कोरोना पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने गरजू लोकांना केलेली मदत याची माहिती देखील दिली. माझ्या सोबत अमरसिंह पंडीत देखील होते, असेही सतीश चव्हाण यांनी सांगितले.

हे ही वाचा ः राज्यात आता फक्त ४५ वर्षांपुढील व्यक्तींनाच लस मिळणार

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख