व्हेंटिलेटरच्या नावाने डब्बे पाठवले, कंपनीवर गुन्हा दाखल करा..

हे व्हेंटिलेटर केंद्र सरकारने परगृहावरून बनवून आणले आहेत का? असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला.
Mi Imtiaz Jalil News on Ventiletor aurangabad
Mi Imtiaz Jalil News on Ventiletor aurangabad

औरंगाबाद ः पीएम केअर फंडातून औंरगाबादला मिळालेले दीडशे व्हेंटिलेटर सर्वच खराब आणि बिनकामाचे निघाले आहे. घाटीतील तज्ञ डाॅक्टारांच्या टीमने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे. (Sent bins in the name of ventilator, file a case against the company, Mp Imtiaz Jalil Demand to Guardian Minsiter Subhsh Desai) केंद्राने व्हेंटिलेटरच्या नावावर डब्बे पाठवेलेत का? असा संतप्त सवाल करत संबंधित कंपनी, एजन्सीवर राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आज झालेल्या खरीप हंगाम पुर्व आढावा बैठकीत पीएम केअरमधून मिळालेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा चांगलाच गाजला. घाटी रुग्णालय व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पाठवलेले सर्वच व्हेंटिलेटर खराब आणि वापरण्यास योग्य नसल्याचे सिद्ध झाले आहे. (All the ventilators sent to the district have been proven to be bad and unusable.)त्यामुळे ते तयार करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले,  व्हेंटिलेटरवरून राजकारण केले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. पण कोरोना संकटाच्या काळात राजकारण कुणालाही करायचे नाही. पण पंतप्रधान सहायता निधीमधून देण्यात आलेले व्हेंटिलेटर फक्त औरंगाबाद, मराठवाड्यातच नाही तर देशातील अनेक राज्यात नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याचे आॅडीट केले जाईल असे स्पष्ट केले. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी तर व्हेंटिलेटर चांगलेच आहेत, तुम्हालाच ते चालवता येत नाहीत,(Prime Minister Narendra Modi himself clarified that it would be audited.) असा अजब दावा केला आहे.

व्हेंटिलेटर परग्रहावर बनवले का?

घाटीमध्ये वर्षानुवर्षे व्हेंटिलेटर आहेत, येथील तज्ञ डाॅक्टर त्यावर रुग्णांना उपचार देतात, मग आताच त्यांना ते कसे चालवावे याचे ज्ञान नाही, असे म्हणणे कितपत योग्य आहे. ज्या कंपनीने व्हेंटिलेटर बनवले, त्यांचे तज्ञ येऊन देखील ते सुरू होऊ शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मग हे व्हेंटिलेटर केंद्र सरकारने परगृहावरून बनवून आणले आहेत का? असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला.

अनेक भाजपशासित राज्यांमध्ये देखील पीएम केअर व्हेंटिलेटरची अशीच अवस्था आहे. मग या विरोधात बोलायचे नाही का? राजकारण केले जाते हे म्हणणे चुकीचे आहे.(The same is true of PM care ventilators in BJP-ruled states.) तातडीने व्हेंटिलेटर बदलून तर दिले पाहिजेच, पण राज्य सरकारने तातडीने ते बनवणाऱ्या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करावा, आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com