नारायण राणेंना वेड्याच्या इस्पितळात पाठवा.. - Send Narayan Rane to a mad hospital jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

नारायण राणेंना वेड्याच्या इस्पितळात पाठवा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 ऑगस्ट 2021

राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यामुळे त्यांना वेड्याच्या इस्पितळात भरती करा.

परभणीः राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अक्षेपार्ह विधान करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना वेड्याच्या इस्पितळात पाठवा, अशी संतप्त मागणी शिवसेनेचे आमदार राहूल पाटील यांनी केली. (Send Narayan Rane to a mad hospital)  मंगळवारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणीत राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या अक्षेपार्ह्य विधानामुळे राज्यभरात राणे यांच्या विरोधात संताप पसरला आहे. (Parbhani Shivsena Mla Rahul Patil) ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात शिवसेना, युवासेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. (Central Minister Narayan Rane) परभणीत शिवसेनिकांनी राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांच्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आमदार राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ  हे आंदोलन करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता आंदोलनास सुरुवात झाली.  शेकडो शिवसैनिक सकाळपासूनच या ठिकाणी जमले होते.  शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून तो जाळण्याचा प्रयत्न केला.

राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.  अर्धातास हे आंदोलन सुरु होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अक्षेपार्ह विधान करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेचा अपमान केला आहे.  हा अपमान शिवसेना कदापिही सहन करणार नाही. आता गाठ शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवावे, असा इशारा देतांना राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यामुळे त्यांना वेड्याच्या इस्पितळात भरती करा, अशी मागणी देखील राहुल पाटील यांनी यावेळी केली.

आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हा प्रमुख विशाल कदम, विधानसभा प्रमुख माणिक पोंढे पाटील, महिला आघाडीच्या सखुबाई लटपटे, अंबिका डहाळे, रविंद्र पतंगे, ज्ञानेश्वर पवार, विशु डहाळे, नंदु पाटील, मकरंद कुलकर्णी, सदाशिव देशमुख, अरविंद देशमुख आदींचा सहभाग होता.

हे ही वाचा ः ठाकरे सरकारचा अखेर राणे दणका, आक्षेपाहार्य वक्तव्यप्रकरणी अटक

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख