शाळांची घंटा अद्याप वाजणार नाहीच; आरोग्यमंत्र्यांचे संकेत.. - The school bells are not ringing yet; Health Minister's signal .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

शाळांची घंटा अद्याप वाजणार नाहीच; आरोग्यमंत्र्यांचे संकेत..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

सध्या लहान मुलांना लस देता येत नसल्याने शाळा सुरु करण्याची प्रक्रिया टप्याटप्याने हाती घ्यावी लागेल.

जालना ः सध्या राज्यात १८ ते ४४ या वयोगटासाठीच लसीकरण सुरू आहे, त्यात देखील केंद्राकडून नियमित पुरवठा नसल्याने खंड पडत आहे. १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम अजून सुरूच नाही, त्यामुळे तुर्तास शाळा सुरू करता येणार नाही, हळुहळु ही प्रकिया सुरू करण्यात येईल, (The school bells are not ringing yet; Health Minister's signal) असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी कोरोनाची तिसरी लाट, डेल्टा प्लसची स्थिती आणि लसीकरण मोहिमे संदर्भात माहिती दिली. टोपे म्हणाले, ज्या भागात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण झाले आहे, अशा ठिकाणची महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. पण लहान मुलांच्या शाळांबाबत असा निर्णय घेता येणार नाही. (State Health Minister Rajesh Tope, Jalna)

सध्या लहान मुलांना लस देता येत नसल्याने शाळा सुरु करण्याची प्रक्रिया टप्याटप्याने हाती घ्यावी लागेल. सध्या लहान मुलांना लसीकरण करता येत नसल्याने त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळा सुरु करण्याची प्रक्रिया नंतर सुरु करू करण्यात येईल. राज्यात बालकांना देण्यात येणाऱ्या काही लसींचा पुरवठा हा केंद्र सरकारकडून केला जातो.

मात्र हा साठा संपल्याने केंद्राकडुन उपलब्ध झाल्यानंतर राज्यात उपलब्ध करून दिली जाईल. एक वर्षाच्या आतील बालकांना मेंदुज्वराने ग्रासू नये यासाठी जालन्यात एक वर्षाच्या आतील बालकांना लस देण्याची मोहिम हाती घेण्यात आली. राजेश टोपे यांच्या हस्ते ही लस आज देण्यात आली.  राज्यातील एक वर्षाच्या आतील बालकांना शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरणाचे ३ डोस देण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

हे ही वाचा ः शिवसेनेवर दबाव आणू शकतील एवढी कराडांची क्षमता नाही..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख