मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी संभाजी ब्रिगेड मोठा लढा उभारणार - Sambhaji Brigade will fight hard to include Maratha community in OBC | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी संभाजी ब्रिगेड मोठा लढा उभारणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 मे 2021

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास कोणत्याही समाजाचा याला विरोध होणार नाही.

औरंगाबाद ः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर त्यांचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. ( Maratha Reservation Judment, React Sabhaji Brigades presdient)  मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकण्याला राज्य सरकार व यामध्ये असलेले मंत्री जबाबदार असल्याचा ठपका ठेवला जातोय. मंत्र्याचे राजीनामे मागितले जात आहेत. यातच आता मराठा समाजाचा सरसट ओबीसीमध्ये समावेश करावा,यासाठी यापुढे संभाजी ब्रिगेड मोठा लढा उभारणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी करत यासाठी मोठा लढा उभारण्याची तयारी सुरू केले आहे. (Maratha Community Includ OBC) या संदर्भात आखरे म्हणाले, १९९१ पासून म्हणजेच गेल्या २० वर्षांपासून ऊर बडवून महाराष्ट्रातील लाखो मराठे आणि आणि संभाजी ब्रिगेड  मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी करत आहेत.

युती सरकारच्या काळात अनेक आंदोलने केली, सरकार सोबत विरोधी पक्षांना देखील यासाठी साकडे घातले, मात्र संभाजी ब्रिगेडच्या या मागणीकडे तत्कालीन सरकार व विद्यमान विरोधी पक्षांनी साफ दुर्लक्ष केलं, यामुळे मराठा समाजाचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन समाजाचं मोठं शैक्षणिक नुकसान झाला आहे. ( Sambhaji Brigade Hard Fight ) समाजाची एक पिढी या प्रक्रियेत वाया गेली आहे, अनेकांचे बलिदान गेले.  तर महाराष्ट्रातील निम्म्या समाजातील तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

असे असताना आता मराठा आरक्षण देखील सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, त्यामुळे यापुढे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात सरसकट समावेश करावा, यासाठी येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीने मोठा लढा उभा करणार आहे.  मनोज आखरे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हिंगोलीत पत्रकारांशी बोलतत होते.

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास कोणत्याही समाजाचा याला विरोध होणार नाही , त्यामुळे सरकारने आता या मराठा समाजातील युवकांचा आक्रोश बाहेर येण्या आधी संभाजी ब्रिगेडच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ हा निर्णय घ्यायला पाहिजे असेही आखरे म्हणाले.

हे ही वाचा : फडणवीस सरकारचा कायदा,अहवाल पाण्यात घालण्याचे काम राज्य सरकारने केले

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख