कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईसाठी वाढीव पथके नेमणार..

रीक्षामध्‍ये प्रत्‍येकी दोनच प्रवासी असावेत, महामंडळाच्‍या बसेस, खासगी टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍या या सर्वांना ५० टक्‍के प्रवासी बसवणे याबाबत सुचना देण्‍यात याव्‍यात.
Aurangabad District Collector News
Aurangabad District Collector News

औरंगाबाद : सध्याची कोविडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेनमधील तरतुदी १५ एप्रिल पर्यंत लागु केलेल्या आहेत. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.         ‍

महाराष्‍ट्र शासनाच्‍या मिशन बिगेन अगेनच्‍या मार्गदर्शक तत्वांची जिल्‍हयात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच संबंधित विभागांची एक बैठक घेतली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, नोडल अधिकारी श्रीमंत हारकर  उपस्थित हेाते.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, नियमांचे पालन न करणा-या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी वॉर्डनिहाय्य तसेच ग्रामीण भागात बाजाराची गावे शोधून तिथे पथक नेमण्‍यात येणार आहेत. या पथकात  जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे २ व पोलीस प्रशासनाचा १ कर्मचारी असे प्रत्‍येकी ३ पर्यवेक्षक असतील. तसेच पाच पथकांसाठी एक निरीक्षक नेमण्यात येईल.

किमान शंभर वाहनांवर कारवाई

महानगरपालिकेतील गर्दीच्‍या तसेच संवेदनशील वॉर्डमध्‍ये आवश्‍यकतेप्रमाणे ४ पर्यवेक्षकांचे पथक असावे ज्यामध्ये १ कर्मचारी हा महानगर पालिकेचा असेल. प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही दोन पथके तयार करावीत. प्रत्येक पथकांमार्फत कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणा-या  दैनंदिन किमान शंभर वाहनांवर कारवाई करावी.

रीक्षामध्‍ये प्रत्‍येकी दोनच प्रवासी असावेत, महामंडळाच्‍या बसेस, खासगी टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍या या सर्वांना ५० टक्‍के प्रवासी बसवणे याबाबत सुचना देण्‍यात याव्‍यात. राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने आपल्‍या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची ५ पथके तयार करावीत. प्रत्येक  पथकांनी शहरातील राज्‍य उत्‍पादन शुल्‍कच्‍या अखत्‍यारीतील दुकाने राञी वेळेत बंद होण्‍याच्‍या अनुषंगाने व कोविड प्रतिबंधित नियमांचे पालन करयासंबंधीत कारवाई करावी.

तसचे नियमांचे पालन न करणा-या दैनंदिन किमान १० आस्‍थापनांवर कार्यवाही करण्‍यात यावी. अन्न व औषध प्रशासनाने शहरातील सर्व हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट्स राञी ८ नंतर फक्‍त पार्सल पद्धतीने चालू राहतील. तसेच इतर वेळी हॉटेल आसनक्षमतेच्‍या फक्‍त ५० टक्‍के क्षमतेने चालू राहतील याबाबत लक्ष ठेवावे नियमांचे पालन व्‍हावे यासाठी अन्‍न व औषध प्रशासनाने तीन पथके गठीत करुन नियमांचे पालन न करणा-या दैनंदिन प्रत्येकी किमान २० आस्‍थापनांवर कारवाई करावी, असेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com