उत्साहाच्या भरात नियम धाब्यावर; दानवेंच्या स्वागताला लोटली गर्दी.. - On the rules corona full of enthusiasm; The crowd thronged to welcome the Danve.jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

उत्साहाच्या भरात नियम धाब्यावर; दानवेंच्या स्वागताला लोटली गर्दी..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 ऑगस्ट 2021

देवगिरी एक्स्प्रेसला विशेष बोगी जोडून दानवे औरंगाबादेत पोहोचले.

औरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे औरंगाबादेत आले. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर खास व्यासपीठ तयार करण्यात आले. पण तेथे एवढी गर्दी होती की, ढकलाढकलीत अनेकजण एकमेकांच्या अंगावर गेले. (On the rules corona full of enthusiasm; The crowd thronged to welcome the Danve.) अतिउत्साहाच्या भरात कोविड नियमांचे साधे भानही कुणाला उरले नाही. ना सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळले गेले ना कुणी मास्क घातला होता.

रेल्वे राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्रीपद रावसाहेब दानवे यांनी स्विकारले. (Central State Railway Minister Raosaheb Danve Welcome In Aurangabad) पद स्विकारल्यानंतर रेल्वेच्या विशेष बोगीतून प्रवास करीत मंगळवारी (ता. १७) सकाळी ते औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पोचले.

तत्पूर्वी केंद्रीय राज्यमंत्री महोदय औरंगाबाद रेल्वे स्थानकात येणार असल्याने त्यांच्या सत्कारासाठी रेल्वेस्थानकातच व्यासपीठ उभारण्यात आले. ते आल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरातील व्यासपीठावर त्यांचे स्वागत करण्यात आले; मात्र त्यावेळी तोबा गर्दी उसळली. परंतु तेथे तुरळक वगळता कुणालाही फारसे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे भान नव्हते.

देवगिरी एक्स्प्रेसला विशेष बोगी जोडून दानवे औरंगाबादेत पोहोचले. रेल्वेस्थानकात मोठी गर्दी उसळली. सर्वांचे स्वागत स्विकारत दानवे रेल्वे स्थानकातून रवाना झाले. स्वच्छतेपासून तर सोयीसुविधांच्या बाबतीत कोणतीही त्रुटी निदर्शनास येणार नाही, याची दक्षता रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली होती.

हे ही वाचा ः आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडात आंदोलन..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख