रामाच्या नावाने झोळी भरणाऱ्या आरएसएस, मोदींनी हिशोब द्यावा..

विशेषतः पंतप्रधान मोदी ज्यांनी राम मंदिराच्या मुद्यावर निवडणूक लढवली आणि सत्ता मिळवली, त्यांनी तर याचा खुलासा केलाच पाहिजे.
Mim Mp Imtiaz Jalil -Ram mandir-Pm Modi News Aurangabad
Mim Mp Imtiaz Jalil -Ram mandir-Pm Modi News Aurangabad

औरंगाबाद ः आम आदमी पक्षाच्या संजयसिंह यांनी राम मंदिर ट्रस्टने मंदिरासाठी अडीच कोटींची जागा साडेअठरा कोटीत घेतल्याचा खळबजनक आरोप केला. यासाठी त्यांनी काही कागपत्रेही सादर केली. (RSS and BJP, which are filling pockets in the name of Rama, should give an account.) यावरून आता देशभरात गदरोळ सुरू झाला असून राम मंदिर निर्माणाच्या कामात देखील भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात आहे. या वादात आता एमआयएमने देखील उडी घेतली आहे.

रामाच्या नावाने मत मागणाऱ्या आणि आपली झोळी भरणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, विश्वहिंदू परिषद आणि विशेषतः पंतप्रधान मोदी यांनी याचा खुलासा करावा. (AIMIM MP IMTIAZ JALIL) ज्या देशभरातील कोट्यावधी भाविकांनी मंदिर निर्माणासाठी पैसे दिले, त्यांना त्याचा हिशोब द्यावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

अयोध्येत राम जन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातील आदेशानंतर झाला. (Ayodhya Ram Mandir Turst) त्यासाठी देशभरातून रामभक्तांकडून कोट्यावधी रुपयांची वर्गणी राम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून गोळा करण्यात आली. परंतु हे मंदिर निर्माण होण्याआधीच त्याचा कामात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होऊ लागले आहे. दोन कोटी रुपयांची जमीन मंदिर ट्रस्टने साडेअठरा कोटी रुपयांत खरेदी केल्याचा खळबजनक आरोप आम आदमी पक्षाचे संजयसिंह यांनी केला.

त्यानंतर राम मंदिर ट्र्स्टचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. ट्रस्टे असा कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला असला तरी आता यावरून राम मंदिरासाठी ज्या हिंदुत्ववादी पक्षांनी आंदोलने केली त्या विश्वहिंदू परिषद, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व भाजपवर टीका सुरू झाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवला.

राम मंदिर उभारण्याची घोषणा निवडणूकीत करून त्या आधारावर मते मागणाऱ्या मोदींनी आता राम मंदिर निर्माणासाठी देशातील जनतेकडून किती पैसा आला याचा हिशेब द्यावा, अशी मागणी केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना  इम्तियाज जलील म्हणाले, राम मंदिराचा मुद्दा हा तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी आणि भाजप सारख्या पक्षांनी राजकारणाचा मुद्दा केला. अनेक वर्ष आपली राजकीय पोळी याद्वारे भाजून घेतली.

ज्या जागेवर रामाचे मंदिर उभारण्याचा निर्णय झाला ती वादग्रस्त जागा होती. तिथे आधी मशिद होती, पण सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत मुस्लिम समाजाने तो निर्णय मान्य केला. आता या जागेवर भव्य राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट उभारण्यात आला. मंदीराचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असतांना त्यासाठी देशभरातील भाविकांनी सढळ हस्ते दान दिले. मात्र आता या पैशात देखील भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.

मोदींनी हिशोब द्यावा..

त्यामुळे रामाच्या नावाने आपली झोळी भरणाऱ्या हिंदुत्वावादाच्या ठेकेदारांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीचा हिशेब खुला केला पाहिजे. विशेषतः पंतप्रधान मोदी ज्यांनी राम मंदिराच्या मुद्यावर निवडणूक लढवली आणि सत्ता मिळवली, त्यांनी तर याचा खुलासा केलाच पाहिजे, असेही इम्तियाज जलील म्हणाले. पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेने राम मंदिर निर्माणासाठी २१ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे मला कळाले आहे.

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने शिक्षणावर, वैद्यकीय सेवा-सुविधांवर पैसा खर्च करणे अपेक्षित आहे. मंदिर, मशिद उभारण्याचे धार्मिक काम हे त्या त्या समाजातील लोक करत असतात. तेव्हा आपला कोट्यावधींचा पैसा कुठल्या कामावर खर्च केला पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे. राम  मंदिर निर्माणाच्या कामात देखील भ्रष्टाचार होत असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com