ओबीसी जनगणने संदर्भात भाजपची भूमिका संधीसाधू, फसवणूक करणारी..

भाजपने निवडणूक जाहिरनाम्यात ओबीसी जनगणना करण्याचे अश्वासन दिले होते.
ओबीसी जनगणने संदर्भात भाजपची भूमिका संधीसाधू, फसवणूक करणारी..
Vanchit Bahujan Aghadi- Rekha Thakur News Aurangabad

औरंगाबादः केंद्र सरकार आणि राज्य सरकार इम्पेरिकल डाटाच्या मुद्यावरुन ओबीसींची शुद्ध फसवणूक करत आहे. दुसरीकडे राज्यातील आघाडी सरकारने विकासाचा खेळखंडोबा केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला. (The role of the Center in the context of OBC census is opportunistic, fraudulent.)

वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यभर संघटन समिक्षा दौरा सुरु केला आहे. त्यानिमित्त आजोजित जिल्हा संवाद मेळाव्यापुर्वी ठाकूर यांनी पत्रकारांसी संवाद साधला. (Vanchit Bahujan Aghadi, Maharashtra)  रेखा ठाकूर म्हणाल्या, ओबीसी इम्पेरिकल डाटा निर्माण करण्यासाठी जनगणनेला पर्याय नाही, त्यासाठीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे. राज्य सरकारनेही समित्या बसवण्यापेक्षा, त्यावर खर्च करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे मागणी केली पाहिजे.

केंद्राची याबद्दलची भुमिका अत्यंत संधीसाधूपणाची व ओबीसींची फसवणूक करणारी आहे. (Obc Reservation Maharashtara) भाजपने निवडणूक जाहिरनाम्यात ओबीसी जनगणना करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र आज भाजप जनगनना करणार नाही अशी भूमिका घेत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी आगामी काळात ओबीसींची जनगणना झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या संवाद मेळाव्यांना राज्यभर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आमच्याकडे तब्बल ४२ लाख मते आहेत, त्यात थोडी भर घातली तर यश आमचेच ही आमची भूमिका आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वोटबॅंक साबुत आहे. तरीही ती वोटबॅंक मजबूत करण्यासाठी भर देण्यावर आमचा प्रयत्न आहे असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ यात फरक आहे. मोठ्यापेक्षा छोट्या मतदारसंघात विकासाची कामे करता येतात, त्यातून बेस तयार करता येतो.

आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघातच दुरावस्था..

राज्यात विकासाच्या नावावर प्रचंड पैसा खर्च करुनही विकास कामे होत नाही. घराणेशाही, कुटूंब केंद्रीत राजकारणाने विकासाचे प्रश्न जटील बनले आहेत. त्यामुळे सामाजीक लोकशाही आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सत्ता निर्माण करण्याचा वंचीतचा निर्धार आहे. आघाडी सरकारच्या काळात तर विकासाचा खेळखंडोबा झालेल आहे. कोरोनाच्या काळात खुप गंभीर प्रश्न निर्माण झाले, त्यात केंद्राचीही जबाबदारी आहे. रोजगार कोलमडले, आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आली होती.

काल जालना दौरा केला त्यावेळी जालना नगर परिषदेचे स्वतःचे हॉस्पिटलच नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगीतले. आरोग्य मंत्री जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघाची ही परिस्थिती आहे. राज्यातच आरोग्य यंत्रणा खिळखीळी झाली आहे. आरोग्य व्यवस्थेत मनुष्यबळ पुरेसे नाही, जे आहेत त्यांना वेतन न देता वाऱ्यावर सोडले आहे. ठाण्यामध्ये सहाय्यक आयुक्तांवर हल्ला होतो ही गंभीर बाब आहे. राज्यात पोलिस आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in