लातूर जिल्ह्यातील रस्ते चकाकणार, केंद्राकडून ११४ कोटींचा निधी

निलंगेकर यांनी नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्ह्याचेखासदार सुधाकर श्रृंगारे यांनाही याविषयी लक्ष घालावे अशी विनंती केली होती.
Bjp Mla Sambhji Patil Nilangekar Thanks to Minsiter Nitin Gadkari News Latur
Bjp Mla Sambhji Patil Nilangekar Thanks to Minsiter Nitin Gadkari News Latur

निलंगा :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ११४ कोटींचा निधी देऊ केला आहे. जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून जिल्हाअंतर्गत रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज होती. केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध नऊ रस्त्यांसाठी ११४ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीस मंजूरी मिळाल्याची माहिती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यास विकासाला अधिक गती प्राप्त होते. त्याचबरोबर शेतकरी व व्यापार्‍यांसाठी हे रस्ते प्रगतीचे महामार्ग ठरू शकतात. या दुरदृष्टीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत रस्तेही अधिक दर्जेदार व्हावेत याकरीता केंद्रीय रस्ते विकास निधी उपलब्ध करून दिला आहे.

या माध्यमातून लातूर जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महामार्गचे काम सुरु असून यासाठी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतला होता. सदर राष्ट्रीय महामार्गचे काम प्रगतीपथावर असून जिल्हाअंतर्गत रस्तेही दर्जेदार व्हावेत, त्यासाठी निधी मिळावा यासाठी देखील निलंगेकर यांनी नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनाही याविषयी  लक्ष घालावे अशी विनंती केली  होती. अखेर या दोघांच्या प्रयत्नांना यश  आले असून केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी ११४ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. 

या रस्त्यांचे भाग्य उजळणार..

या निधीच्या माध्यमातून लातूर तालुक्यातील ढाकणी ते भेटा व सारसा- गाधवड- शिरोळ- बोरगाव (का.)- निवळी, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर ते बेलूर व घाटनांदूर- अहमदपूर- थोडगा- मोघा या रस्त्यांची कामे होणार आहेत. त्याचबरोबर औसा तालुक्यातील औसा- याकतपूर- कन्हेरी- जयनगर- किनीथोट- शेडोळ- खरोसा व चिंचोलीराव वाडी- औसा- नागरसोगा- दापेगाव- गुबाळ- सास्तुर तर उदगीर शहरासाठी बिदर रोड ते छत्रपती शिवाजी चौक ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

निलंगा तालुक्यातील उजेड- निटूर- लांबोटा- निलंगा- कासारशिरसी- मुळज- तुरोरी हा रस्ता दर्जेदार होणार असून याच तालुक्यातील निटूर-शिरोळ-हेळंब हा रस्ता होणार असून याच रस्त्यावरील गिरकसाळ येथे मांजरा नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. या कामांसाठी आवश्यक असणारा  निधी राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आलेला असून लवकरच लातूर जिल्ह्यातील या रस्त्यांच्या कामांस सुरुवात होणार आहे. 

मांजरा नदीवर होणार पुल

निलंगा तालुक्यातील निटूर-शिरोळ-हेळंब या रस्त्यावर गिरकसाळ येथे मांजरा नदीवर पुला व्हावा, अशी मागणी अनेक दिवसापासून होती. केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून आता या पुलाच्या कामास ५६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com