पुरोगामी विचाराच्या बाता मारून मनुवादाचे जनत करणाऱ्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा बुरखा फाडा..

महाराष्ट्रात प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्य माणसाला सतेत पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून आज काम करत आहे.
पुरोगामी विचाराच्या बाता मारून मनुवादाचे जनत करणाऱ्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा बुरखा फाडा..
Vanchit Bahujan Aghadi- Rekha Thakur News Aurangabad

औरंगाबाद : बाळासाहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात येत्या काळात वंचितांना सत्तेत घेऊन जाण्याचा निश्चय केला आहे. हा निर्धार पूर्ण करायचा असेल तर महाराष्ट्रातील कानाकोप-यात समाजातील विशिष्ट स्तरावर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या बुद्धिजीवी  वर्गाने आता या विद्वत सभेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणे गरजेचे आहे, (The responsibility of sending the deprived to power should now be taken by the intelligentsia.) असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकुर यांनी केले.

फुले-आंबेडकर विद्वतसभा या संघटनेच्या महाराष्ट्रातील विभागिय समन्वयकांची चिंतन बैठक नुकतीच औरंगाबादमध्ये पार पडली. (Vancit Bahujan Aghadi Maharashtra) यावेळी मार्गदर्शन करतांना ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्रात प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्य माणसाला सतेत पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून आज काम करत आहे. ( Vba Leadeer Prakash Ambedkar, Rekha Thakur.) निवडणुका येतील- जातील पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वंचित अतिशय चोखपने लोकशाहीच्या मार्गाने लढत आहे आणि राहील. 

घराणेशाहीचा कचाट्यात सापडलेल्या शिक्षणसंस्था त्यातून पसरविले जाणारे बनावट पुरोगामी विचार हे कधीच सर्वसामान्यांना शिक्षण, रोजगार, व सन्मानाची संधी उपलब्ध करून देऊ शकणार नाहीत. पुरोगामी विचाराच्या बाता मारून मनुवादाचे  जतन करणाऱ्या कांग्रेस- राष्ट्रवादी किंवा तत्सम राजकीय पक्षाचा बुरखा फाडण्यासाठी आता वंचित समुहातुन येणाऱ्या शिक्षक- प्राध्यापकांनी समोर यायला पाहिजे.

त्यांच्या सहकार्यानेच वंचितांना सत्तेत पाठवु . बुद्धीजीवी  वर्गाने  वैचारिक व दिशादर्शक चळवळ वंचितांसाठी उभी करावी, ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.  त्यांनी सहकार्य केल्यास आपण सत्तेत जाऊ, असा विश्वासही रेखा ठाकुर यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in