मुुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद;अशोक चव्हाणांनी घेतला हा महत्वाचा निर्णय.. - Responding to the Chief Minister's call, Ashok Chavan took this important decision. | Politics Marathi News - Sarkarnama

मुुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद;अशोक चव्हाणांनी घेतला हा महत्वाचा निर्णय..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

या महोत्सवाला नांदेडसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक हजेरी लावत असतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा बनली आहे.

औरंगाबाद ः राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या भाषणातून सामजिक, राजकीय कार्यक्रम ने घेण्याचे आवाहन विविध पक्ष,  संघटना व लोकप्रतिनिधींना केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी नांदेडात घेण्यात येणारा संगीत शंकर दरबार महोत्सव रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे.

राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांना एकापाठोपाठ एक अशी कोरोनाची लागण होत असतांनाच मुंबई, अमरावती, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये देखील रुग्ण संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काल संवाद साधला.

कोरोनाच्या पहिल्या टप्यात जशी काळजी घेतली तशीच काळजी पुन्हा घ्यावी लागणार असल्याचे सांगत त्यांनी सार्वजनिक, सामाजिक, सांस्कृतिक जाहीर कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी प्रतिसाद देत आपले सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले. 

त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी देखील पुढाकार घेत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महत्वाचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस नांदेडमध्ये संगीत शंकर दरबार या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाला नांदेडसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक हजेरी लावत असतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा बनली आहे.

परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता धोका लक्षात घेता, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अशोक चव्हाण यांनी यंदाचा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळापुर्वीच चव्हाण यांनी ही माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख