राजेंबद्दल आदर, पण त्यांनी माहिती घेऊन टीका करायला हवी होती..

नांदेडमध्ये आंदोलन करून अशोक चव्हाण यांना व्यक्तिगत विरोध करण्याचा हा डाव होता.
Chhatrapati Sambhajiraje-Ashok Chavan- Reservation News Nanded
Chhatrapati Sambhajiraje-Ashok Chavan- Reservation News Nanded

औरंगाबाद ः छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. नांदेडमधील आंदोलन हा भाजपचा डाव असून राजेंनी माझ्यावर व्यक्तीगत टीका करण्यापुर्वी बारकाईने माहिती घ्यायला हवी होती, (Respect for the kings, but they should have taken the information and criticized, Said, Minister Ashok Chavan) अशा शब्दांत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाच्याच्या वतीने मुक आंदोलन करण्यात आले. (Maratha Reservation Maharashtra) यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.

दिल्लीत पंतप्रधानांना व काॅंग्रेसच्या इतर नेत्यांना भेटलेल्या चव्हाण यांना आपल्याला भेटायला वेळ मिळाला नाही, ( Bjp Mp Chhatrapati Sambhajiraje) असे म्हणतांनाच मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागास ठरवण्याची जबाबदारी नांदेडचे सुपूत्र व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची असल्याचे सांगत संभाजीराजे यांनी तुमचे पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल केला होता.

याशिवाय ईडब्लूएस, एमपीएससी उमेदवारांना नियुक्त्या, वसतीगृह, सारथी या सगळ्याच विषयांवरून संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण व राज्य सरकारवर तोफ डागली होती. संभाजीराजे यांच्या आरोपांना अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, संभाजीराजे यांनी माझ्यावर व्यक्तीगत टीका केली असली, तरी मी व्यक्तीगत त्यांना उत्तर देणार नाही. मला संभाजीराजे यांच्याबद्दल आदर आहे, पण त्यांनी टीका करण्यापुर्वी बारकाईने माहिती घ्यायला हवी होती. राजे यांना माहीत होते की नाही मला माहित नाही, लोकसभेत एकही मराठा सदस्य आरक्षणावर बोलला नाही. त्यामुळे आजचे आंदोलन हे भाजप प्रणित आंदोलन होते, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

१०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार दिले असले तरी, ५० टक्क्यांची अट शिथील केली नसल्यामुळे हा प्रश्न आणखी कठीण होऊन बसला आहे. केंद्र सरकार याबाबत कुठलीही भूमिका घेत नाहीये.  त्यामुळे नांदेडमध्ये आंदोलन करून अशोक चव्हाण यांना व्यक्तिगत विरोध करण्याचा हा डाव होता, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. अनेक मराठा संघटना नांदेडमधील आंदोलनापासून दूर होत्या, असा दावाही त्यांनी केला.

सारथी संस्थेबद्दल बोलतांना चव्हाण म्हणाले, सारथी संस्थेला कोल्हापूर येथे उपकेंद्र केले आहे, ते देखील राजेंच्या हस्ते. पुण्यात देखील सारथी संस्थेसाठी जागा देण्यात आली आहे. राहिला प्रश्न खुल्या वर्गत जाण्यासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र कुठे ही मागण्यात आलेले नाही. शिवाय ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देखील पुर्वलक्षित दिले जात आहे. त्यामुळे या संदर्भात राजे यांनी केलेली टीका योग्य नाही.

अण्णा साहेब पाटील महामंडळा संदर्भात निर्णय झालेले आहेत, त्यानूसार महामंडळाला अधिकार देण्यात आले आहेत.  मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानूसार ते सुरू केले जात आहेत. १४ ठिकाणी वसतिगृह उभारणी बाबत आढावा घेण्यात आल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काही गुन्हे मागे घेता येण्यासारखे नाहीत..

मराठा आंदोलना दरम्यान, दाखल झालेले गुन्हे अजूनही मागे घेण्यात आले नसल्याचे सांगत संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर टीका केली, याचा संदर्भ देत चव्हाण यांनी अनेक गुन्हे मागे घेण्यात आले असल्याचे सांगतांनाच काही गुन्हे हे गंभीरस्वरुपाचे आणि मागे घेण्यासारखे नसल्याचे स्पष्ट केले.

आंदोलना दरम्यान, एका ठिकाणी जीवितहानी तर पाच ठिकणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या शिवाय १६ असे गुन्हे आहेत जे मागे घेता येणार नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी सरकारकडून केले जात असलेले प्रयत्न या संदर्भात सविस्तर पत्र राजेंना दिले आहे. संभाजी राजे काही बोलले असतील तरीही मला राग येणार नाही, किंवा मी वाईट मानून घेणार नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com