निती आयोगाचा तो अहवाल जूनमधला; तरीही आम्ही सज्ज..

आम्ही पंधरा लाखापर्यंत दररोज लसीकरण करण्याची तयारी केलेली आहे. परंतु केंद्राकडून लसीचा पुरवठा नियमित होत नसल्याने या कामाला ब्रेक लागला आहे.
Health Minister Rajesh Tope press Conference News Aurangabad
Health Minister Rajesh Tope press Conference News Aurangabad

औरंगाबाद ः कोरोनाची तिसऱ्या लाटे संदर्भात निती आयोगाने केंद्राल अहवाल सादर केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या आहेत. सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता त्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. (That report of the Policy Commission in June; Still we are ready. Said Health Minister Rajesh Tope) परंतु निती आयोगाचा तो अहवाल हा दोन महिन्यापुर्वी म्हणजेच जूनमधला असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

औरंगाबादेत पत्रकारांनी टोपे यांना निती आयोगाचा अहवाल आणि संभाव्य  तिसऱ्या लाटे संदर्भात राज्य सरकारची तयारी याबाबत विचारले. (Corona Third Weave In Maharashtra) यावर उत्तर देतांना टोपे म्हणाले, मुळात निता आयोगाचा जो अहवाल केंद्राला देण्यात आला आहे, तो काही आताचा नाही, तर जून महिन्यात दिलेला आहे. यात सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

एवढचे नाही तर तिसऱ्या लाटेत देशात दररोज चार ते पाच लाख कोरोनाचे रुग्ण आढळतील अशी भिती देखील व्यक्त करण्यात आली होती. (Health Minister Rajesh Tope Maharasshtra) अजून तरी तसा कुठलाही धोका दिसत नाही, परंतु तरीही मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करून या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता सर्व पुर्व तयारी केली आहे. आॅक्सीजन, औषधी, आयसीयु बेड्स, आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर्स व इतर कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

यासाठी अर्थसंकल्पात स्वंतत्र तरतूद देखील राखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकार तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज असून राज्याने एकाच दिवसात साडेदहा लाख लोकांचे लसीकरण करण्याचा विक्रम केला आहे. आम्ही पंधरा लाखापर्यंत दररोज लसीकरण करण्याची तयारी केलेली आहे. परंतु केंद्राकडून लसीचा पुरवठा नियमित होत नसल्याने या कामाला ब्रेक लागत असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून मुबलक प्रमाणात राज्याला लस मिळवून देण्यासाठी सोबत दिल्ला येण्याचे आश्वासन दिले होते? त्याचे काय झाले? या प्रश्नावर माझे आणि फडणवीसांचे फोनवर बोलणे झाले आहे. पण सध्या ते व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना वेळ मिळत नसावा. पण आम्ही मुबलक लस साठा मिळावा यासाठी त्यांची मदत निश्चित घेणार आहोत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

राजकीय पक्षांनी भान ठेवावे..

राज्यावर कोरोनाचे संकट कायम असतांना देखील भाजपसह अन्य राजकीय पक्षाचे मेळावे, यात्रा निघत आहेत, यावर सरकार काही कारवाई करणार का? यावर कोरोनाचा धोका कायम आहे हे राज्य सरकारने स्पष्ट करून अशावेळी घ्यावयाची काळजी, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ या बाबतची नियमावली जाहीर केलेली आहे.

राज्याचे सुजाण नागरिक म्हणून जशी ते पाळण्याची जबाबदारी सर्वसामान्यांची आहे, तशीच ती राजकीय पक्षांची देखील आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. राहिला कारवाईचा प्रश्न तर याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे टोपे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com