जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक संशयितांचा अहवाल निगेटीव्ह

प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे राज्यात सर्वाधिक सुमारे ८९ हजार कोरोना चाचण्या करण्याचा विक्रम महापालिकेने केला. आत्तापर्यंत शहरात एक लाख १४ हजार ६४० कोरोना चाचण्या झाल्या. त्यातून १०,२६२ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर तब्बल एक लाख दोन हजार ४९१ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले.
above one lac corona test is negetive news
above one lac corona test is negetive news

औरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने चाचण्यांचा वेग वाढविला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यानंतर एक लाख चाचण्या घेणारे औरंगाबाद शहर तिसऱ्या क्रमांवर आहे. आत्तापर्यंत एक लाख १४ हजार संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील एक लाख दोन हजार ४९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेतर्फे आरटीपीसीआर पद्धतीने बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅब घेतले होते. मात्र या चाचण्यांचे अहवाल २४ तासानंतर येत असल्याने मर्यादा पडत होत्या. दरम्यान आरटीपीसीआर पद्धतीच्या कीट उपलब्ध होताच राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला या कीटचा वापर करण्याच्या सूचना केल्या. 

सुरुवातीला राज्य शासनाने पाच हजार कीट दिल्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी एक लाख कीट खरेदी करून १० जुलैपासून शहरात अ‍ॅन्टिजेन व आरटीपीसीआर टेस्टची मोहीम राबवण्यासाठी फिरती पथके, मोबाइल टीम, सहा एन्ट्री पॉइंट अशी ३९ पथके तैनात केली.

त्यामुळे प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे राज्यात सर्वाधिक सुमारे ८९ हजार कोरोना चाचण्या करण्याचा विक्रम महापालिकेने केला. आत्तापर्यंत शहरात एक लाख १४ हजार ६४० कोरोना चाचण्या झाल्या. त्यातून १०,२६२ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर तब्बल एक लाख दोन हजार ४९१ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. 

मृत्युदर पुन्हा वाढला 

शहरातील मृत्यूदरावरून देखील चिंता व्यक्त केली जात होती. मात्र पाच टक्क्यांपेक्षा जास्त असलेला मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र बुधवारी (ता. २९) प्राप्त झालेल्या अहवालानुसार मृत्युदर पुन्हा चार टक्क्यांच्या वर गेला आहे. मृत्युदर ४.०७ टक्के एवढा नोंदविला गेला.

आज जिल्ह्यात ३४१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, आज दिवसभरात २७६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत १३८४२ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ९९६१ बरे झाले आहेत. तर ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited By: Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com