रमझानमध्ये नमाजासाठी `ब्रेक द चेन`मधून सुट द्या, राष्ट्रवादीची मागणी - Release from lockdown for namaz in Ramadan, NCP demands | Politics Marathi News - Sarkarnama

रमझानमध्ये नमाजासाठी `ब्रेक द चेन`मधून सुट द्या, राष्ट्रवादीची मागणी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

राष्ट्वादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी मुंबईत नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.

औरंगाबाद ः राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे रमझानच्या पवित्र्य महिन्यात मुस्लिम बांधवांना नमाज घरातच अदा करावी लागली होती. मुस्लिमांसाठी रमाझनमधील तराबीच्या नमाजला अंत्यत महत्व असते. १४ एप्रिलपासून रमझान सुरू होत असल्याने रोजच्या अर्धा तासाच्या नमाजासाठी `ब्रेक द चेन`मधून सूट द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे, रुग्णांचे आणि मृतांचे प्रमाण धडकी भरवणारे आहे. परंतु संपुर्ण लाॅकडाऊनला सर्वच स्तरातून विरोध होत असल्याने राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत येत्या ३० एप्रिल पर्यंत जीवनावश्यक सेवा वगळून राज्यात कठोर निर्बंध लादले आहेत. दुकाने बंद असल्याने नुकताच व्यापाऱ्यांनी या विरोधात मोर्चा काढला. व्यापाऱ्यांच्या मागणीवर राज्य सरकार विचार करत असतांना राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून रमाझानच्या नमाजासाठी सुट देण्याची मागणी केली जात आहे.

राष्ट्वादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी मुंबईत नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. १४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पवित्र महिन्यात दररोज मशिदीमध्ये जाऊन तराबीची नमाज अदा करण्याला मुस्लिम धर्मियांमध्ये खूप महत्व असते. गेल्या वर्षी कोरोनामुळे समाज बांधवांनी सरकारला पुर्ण सहकार्य करून घरातच नमाज अदा केली. परंतु या वर्षी `ब्रेक द चेन`मधून रमाझानच्या विशेष नमाजासाठी सुट द्यावी, अशी मागणी कदीर मौलाना यांनी या भेटी टोपे यांच्याकडे केली.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सर्व नियम पाळून रमाझानची नमाज अदा केली जाईल, असा विश्वास देखील मौलाना यांनी राजेश टोपे यांना दिला. यावर आपण या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांशी बोलू व तुमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहचवू असे आश्वासन टोपे यांनी कदीर मौलांना यांना दिले आहे. शिवाय मंत्रीमंडळ बैठकीत देखील या विषयावर विचार करून योग्य निर्णय घेण्याची मागणी मी करने, असेही टोपे यांनी या भेटीत सांगतिल्याचे कदीर मौलाना यांनी कळवले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख