करुणा शर्मा - मुंडेंची मुक्तता करा; माजी सैनिक मैदानात..

भारत ज्योती पुरस्काराने सन्मानित झालेले माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
Karuna Munde News Beed
Karuna Munde News Beed

बीड : प्राणघातक हल्ला व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा - मुंडे यांच्या समर्थनाथ माजी सैनिक मैदानात उतरले आहेत. करुणा शर्मा - मुंडे यांची सार्वजनिक व प्रशासनिक अत्याचारातून मुक्तता करावी, (Release Karuna Munde from jail, ex-servicemen in the field ) अशी मागणी करत प्रकाश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक आणि भारत ज्योती पुरस्काराने सन्मानित झालेले प्रकाश वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सैनिकी वेषातच उपोषण सुरु केले आहे. (Karuna sharma-Munde, Mumbai)  

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडें यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीला आलेल्या करुणा शर्मा - मुंडे यांच्या विरोधात रविवारी (ता. पाच) प्राणघातक हल्ला व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. (Minister Dhnanjay Munde, Beed) न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या त्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. त्यांच्या जामिन अर्जावर मंगळवारी (ता. १४) होणारी सुनावणीही पुढे ढकलली आहे.

दरम्यान, आता त्यांच्या समर्थनार्थ प्रकाश वाघमारे यांनी निवेदन दिले आहे. करुणा शर्मा - मुंडे एक वर्षापासून आपल्या हक्क - अधिकारासाठी लढत असताना त्यांनाच खोट्या केसमध्ये गोवले जात आहे, असा आरोप करुन शासनाने ताकीदवजा पत्र काढावे अशी मागणीही करण्यात आली. देशसेवा व समाजसेवेचे व्रत अंगीकारुन पत्र लिहीत असल्याचेही वाघमारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

शर्मा यांना अनेक विसंगत प्रकरणांत नितीमुल्य बाजूला ठेवून गुन्हेगारी प्रकरणांत अडकवले जात आहे. खोट्या केस करणाऱ्यांवर आणि संविधान संहिता घटनेने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन करुन प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी व कर्मचारी व्यभिचार करत असतील तर त्यांच्यावरही कारवाईची मागणी प्रकाश वाघमारे यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com