लाॅकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री १५ रोजी निर्णय घेतील - Regarding lockdown, Chief Minister, Deputy Chief Minister will take decision on 15th | Politics Marathi News - Sarkarnama

लाॅकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री १५ रोजी निर्णय घेतील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 मे 2021

राज्यातील कोरोना रुग्ण संख्या सध्या स्थिरावलेली असून केंद्र लॉकडाऊन अथवा कठोर निर्बधांबाबत काय निर्णय घेते यावर राज्याचे लक्ष आहे.

जालना ः कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आहे, अशा परिस्थितीत पंधरा तारखेनंतर काय? असा प्रश्न सर्वांचा सतावतो आहे. (Health Minister Rajesh Tope Stetment About Lockdown) लाॅकडाऊन संपणार की त्यात वाढ होणार? यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लाॅकडाऊनचे परिणाम मोठे असल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हेच या संदर्भात १५ तारखेनंतर निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने १५ मे पर्यंत कडक निर्बंध, संचारबंदी लागू केली आहे. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही, रुग्णसंख्या शहरी भागात कमी झाली असली तरी ग्रामीण भागात वाढते आहे. ( Chief Minister And Deputey Chief Minsiter Decided About Lockdown After 15 th of May)  त्यामुळे पुढे काय? या संदर्भात जालना टोपे यांनी लाॅकडाऊन, लसीकरण, आॅक्सिजन, रेमडेसिव्हिर व इतर विषयाची सविस्तर माहिती दिली. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि राजूर येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

टोपे म्हणाले, राज्यात लसीकरण मोहिम अधिक वेगवान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण त्यासाठी केंद्राने जास्तीत जास्त लस पुरवठा करावा ही अपेक्षा आहे. राज्यात जलदगतीने लसीकरण व्हावं हि आमची अपेक्षा आहे. मात्र केंद्राकडून लस पुरवठा झाला पाहिजे त्या प्रमाणावर होत नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे.

लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आम्ही लसींची मागणी केंद्राकडे करत आहोत. पण ४४ वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण जलदगतीने होण्यासाठी  लसींची आवश्यकता आहे. केंद्र लस देवो अथवा न देवो आम्ही ४४ वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण जलदगतीने करणारच असा विश्वास देखील टोपे यांनी व्यक्त केला. 

केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष

राज्यातील कोरोना रुग्ण संख्या सध्या स्थिरावलेली असून केंद्र लॉकडाऊन अथवा कठोर निर्बधांबाबत काय निर्णय घेते यावर राज्याचे लक्ष आहे. मात्र लॉकडाऊनमुळे होणारे परिणाम हे मोठे असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर १५ तारखेनंतर निर्णय घेतील.

सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये बिल चेकिंग करण्यासाठी नेमण्यात आलेले ऑडिटर घरी बसून पगार घेत असल्याचे  व त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांकडून खाजगी दवाखाने जास्तीचे बिल आकारत आहेत. (Special Oditar appoint in private Hospital for Bill Checking) या संदर्भात विचारले असता, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑडीटर नेमण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना दिल्याचे टोपे यांनी सांगितले.ऑडिटरकडून बिलाची तपासणी योग्य पद्धतीने केल्यास तक्रारी येणं बंद होतील, असेही टोपे म्हणाले.

हे ही वाचा ः अजितदादांनी एक फोन फिरवला आणि औषधे मुंबईहून पुण्यात एका तासांत

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख