आरक्षणाच्या मुद्यावर दहावेळा निलंबित होण्यास तयार.. - Ready to be suspended ten times on reservation issue. | Politics Marathi News - Sarkarnama

आरक्षणाच्या मुद्यावर दहावेळा निलंबित होण्यास तयार..

आनंद इंदाणी
सोमवार, 5 जुलै 2021

जनतेचा आवाज दाबण्याचे काम जर हे महाविकास आघाडी सरकार करत असेल तर शेवटपर्यंत आम्ही लढा देण्याचे काम करू.

बदनापूर  : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात बेशिस्त वर्तन केल्याच्या आरोपावरून बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यासह बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले. (Ready to be suspended ten times on reservation issue.) मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर दहावेळा निलंबित केले तरी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी घेतली आहे.

निलंबनाच्या कारवाईबद्दल बोलतांना कुचे म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू द्यावे, अशी मागणी आम्ही केली. (Bjp Mla Narayan Kuche, Badnapur) मात्र महाविकास आघाडी सरकारला या विषयावर चर्चा नको असल्यामुळे त्यांनी राजकीय सूडबुद्धीने आमचे निलंबन केले. अर्थात आरक्षणाच्या मुद्यावर एकवेळ काय दहावेळा निलंबन केले तरी चालेल.

ओबीसी राजकीय आरक्षणासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष चर्चेची मागणी करत असताना राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू न दिल्यामुळे आम्ही सर्व आक्रमक झालो होतो. आरक्षण कस मिळतंय याची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला असता आमचे निलंबन करण्यात आले.

जनतेचा आवाज दाबण्याचे काम जर हे महाविकास आघाडी सरकार करत असेल तर शेवटपर्यंत आम्ही लढा देण्याचे काम करू. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी राजकीय सूडबुद्धीने आमच निलंबन केल्याबद्दल शिवाय ओबीसी राजकीय आरक्षण व मराठा आरक्षणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आम्ही मराठा व ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही कुचे यांनी दिला.

हे ही वाचा ः भास्कर जाधव यांनीच शिवी दिली, अभिमन्यू पवार यांचा दावा..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख