मराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर रास्तारोको..

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
Aurangabad-Solapur National Hiaghway Blocked News
Aurangabad-Solapur National Hiaghway Blocked News

जालना-अंकुशनगर : राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या चार महिन्यांपासून शांततेत लढा देणाऱ्या साष्टपिंपळगाव ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. (Maratha Reservation Suprem Court Judgment Agianst Protest) या निर्णयाच्या निषेधार्थ औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील  पैठण फाटा येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला.

मराठा आंदोलकांनी महामार्गावरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाली होता. दरम्यान पोलिसांनी  पंधरा ते वीस आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. (Rally And National Highway Blcok) तत्पूर्वी साष्ट पिंपळगाव ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत १० किलोमीटर तीनशे ते चारशे मराठाआंदोलकांनी पदयात्रा काढली.  

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. गेल्या चार महिन्यांपासून शांततेत लढा देणाऱ्या साष्टपिंपळगाव ग्रामस्थांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याच्या निर्णयामुळे प्रचंड नाराजी पसरली आहेे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Logn March For Maratha Reservation) पदयात्रा काढत मराठा आंदोलकांनी महामार्गाकडे धाव घेतली.  तीनशे- चारशे आंदोलक महामार्गावर ठिय्या धरून बसले. या सर्व प्रकारामुळे पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची भंबेरी उडाली. याठिकाणी

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप पाटील, पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. दंगल नियंत्रण पथक, दामिनी पथक देखील घटनास्थळी बोलावण्यात आले होते. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com