रावसाहेब दानवेंनी कोरोना लस घेतली, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केले आवाहन

राज्यात व देशात काही ठिकाणी कोरोना लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती दगावण्याच्या घटना घडल्यामुळे अनेकांनी लस घेण्यास नकार दिल्याचे प्रकार समोर आले होते.
Bjp Central Minister Raosaheb Danve news jalna
Bjp Central Minister Raosaheb Danve news jalna

जालना: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेेब दानवे यांनी आज जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. कोरोनाची लस पुर्णपणे सुरक्षित आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, लस टोचून घेत कोरोना विरुद्धच्या लढ्यात तुम्हीही सहभागी व्हा, असे आवाहन देखील दानवे यांनी केले.

देशात साठ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी देखील कोरोना लस टोचून घेत जनतेला आवाहन केले. मराठवाड्यात देखील या कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी आज जालना जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली. कोरोना विषाणूंच्या विरोधात लढा देण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात ही लस महत्वाची ठरणार आहे. परंतु अजूनही कोरोना लसी संदर्भात अनेकांच्या मनात भिती, शंका आहे.

राज्यात व देशात काही ठिकाणी कोरोना लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती दगावण्याच्या घटना घडल्यामुळे अनेकांनी लस घेण्यास नकार दिल्याचे प्रकार समोर आले होते. परंतु केंद्र व राज्याच्या आरोग्य विभागाने देखील ही लस पुर्णपणे सुरक्षित असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार या लसीकरण मोहिमेत सहभागी होतांना दिसत आहेत. रावसाहेब दानवे यांनी लस घेतल्यानंतर नागरिकांना आवाहन करतांना कोरोना लस पुर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. प्रत्येक नागरिकाने कोरोना लस घेऊन या लढ्यात सहभागी व्हावे. लस घेतल्यानंतरही मास्क, हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे असल्याचेही दानवे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com