रावसाहेब दानवे म्हणाले, राहुल गांधी तर गावात सोडलेल्या मोकाट सांडासारखे..

देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदीच का हवेत? हे सांगताना त्यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याच्या काॅंग्रेसच्या मागणीची खिल्ली उडवली.
रावसाहेब दानवे म्हणाले, राहुल गांधी तर गावात सोडलेल्या मोकाट सांडासारखे..
Railway state Minister Raosaheb Danve-rahul Gandhi News jalana

जालना ः पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे श्रेष्ठ आहेत हे सांगतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना थेट गावात सोडलेल्या मोकाट साडांशीच केली. बदनापूर येथे जनआशिर्वाद यात्रेत उपस्थितांना संबोधित करतांना दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे पहायला मिळाले. (Raosaheb Danve said, Rahul Gandhi is like a stray bull left in the village. Said Minsiter Raosaheb Danve) दरम्यान दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने काॅंग्रेसचे नेते व पदाधिकारी चांगलेच भडकले आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची जनआशिर्वाद यात्रा जालना मार्गे दुपारी बदनापूरात आली. तिथे भाजपचे आमदार नारायण कूचे यांनी दोन्ही मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी सगळ्यात शेवटी भाषण केले. (Jan Ashirwad Rally) या भाषणात देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदीच का हवेत? हे सांगताना त्यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याच्या काॅंग्रेसच्या मागणीची खिल्ली उडवली.

राहुल गांधी यांना आपण सभागृहात वीस वर्षांपासून पाहतो, असा उल्लेख करतांनाच गावात लोकं जनावरं जशी देवाला सोडतात आणि त्यानंतर त्यांचा कोणत्याच कामाला उपयोग होत नाही. (Central State Finance Minister Dr.Bhagwat Karad) तसेच राहुल गांधी असून ते पंतप्रधान पदासाठी  लायक नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

मोकाट सोडलेला सांड कुठेही जातो, कुणाच्याही शेतात जातो,काहीही खातो कुणी त्याला अडवतही नाही. खाऊ द्या, हा सांड कुठं जाईल खायला म्हणून त्याला सूट दिली जाते. मग तो खाऊन लठ्ठ होतो, पण त्याचा काहीच उपयोग नसतो, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in