राणेंकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी अन्याय सहन न झाल्यामुळेच..

नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे, हे त्यांचे मत आहे. अन्याय सहन न करण्याचा त्यांचा स्वभाव महाराष्ट्र ओळखून आहे. कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.
bjp ledear sujeetingh thakur news
bjp ledear sujeetingh thakur news

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाने कोणत्याही आमदाराला मुंबईला बोलाविलेले नाही. त्यामुळे कोणताही आमदार मुंबईला गेलेला नाही. हे सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल, भाजपला हे सरकार पाडण्यात कोणतेही स्वारस्य नसल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले. राज्यात आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे सर्व आमदार मुंबईकडे रवाना झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

कोरोनाने राज्याला विळखा घातलेला असताना राजकीय घडमोडींना देखील वेग आला आहे. विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या राज्यपालाशी सुरु असलेल्या भेटी आणि चर्चा यातून अनके तर्क लढवले जात आहेत.

भाजचे खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घेतलेली भेट यामुळे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. त्यातच भाजपने आपल्या सर्व १०५ आमदारांना मुंबईत बोलावल्याच्या चर्चेने काही तरी जोरदार हालचाली सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले.

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सरचिणीस सुजितसिंह ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ठाकूर म्हणाले, खासदार नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे, हे त्यांचे मत आहे. अन्याय सहन न करण्याचा त्यांचा स्वभाव महाराष्ट्र ओळखून आहे. कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सरकारला कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णतः अपयश आले आहे. म्हणूनच नारायण राणे यांनी ही मागणी केली. भारतीय जनता पक्षाची ही मागणी नाही, भूमिकाही नाही, हे सरकार पाडण्यात भाजपला स्वारस्य देखील नाही. 

या सरकारमध्ये समन्वय नसून पृथ्वीराज चव्हाण वेगळे बोलतात तर विदर्भातील मंत्री वेगळे बोलतात, असे सगळे सर्व सुरू आहे. काँग्रेसचे काही मंत्री वरिष्ठ नेतृत्वाकडे जाऊन अधिकारी आमचे ऐकत नसल्याच्या तक्रारी करीत आहेत. हे सरकार त्यांच्या कर्मांनीच पडेल, आम्हाला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही, असेही ठाकूर यांनी नमूद केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com