राणेंचा घरात घुसून कोथळा बाहेर काढतो; शिवसेना आमदाराची धमकी..

तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलिस प्रोटेक्शन जरा बाजूला करं.
राणेंचा घरात घुसून कोथळा बाहेर काढतो; शिवसेना आमदाराची धमकी..
Shivsena Mla Santosh Bangar -Narayan Rane News Hingoli

हिंगोली ः शिवसेनेला वारंवार आव्हान देणाऱ्या नारायण राणे यांना शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी थेट घरात घुसून कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (Rane enters the house and.. ShivSena MLA's threat) यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना बांगर यांनी राणे यांचा कोथळा बाहेर काढण्याची गंभीर धमकी दिल्यामुळे आता नवाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राणे हे भाजपचे पिसाळेले कुत्रे आहेत, अशी टीका याआधीच शिवसेनेच्या एका आमदाराने केली आहे. आता त्यात बांगर यांनी राणे यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याने भाजप-सेनेतील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे. (Shivsena Mla Santosh Bangar Kalmnuri-Parbhani) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान एका पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून मी त्यांच्या कानशीलात लगावली असती, असे विधान केले होते.

त्यानंतर राणे यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. एवढेच नाही तर रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना थेट अटक करत संगमेश्वर आणि त्यानंतर महाड पोलिस ठाण्यात हलवले. (Central Minister Narayan Rane) केंद्रीय मंत्री असलेल्या राणे यांना अटक केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत.

त्यामुळे एकीकडे राज्यभरात शिवसेनेचे राणेंविरोधात आंदोलन तर दुसरीकडे राज्य सरकारने सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करत भाजपचे आंदोलन सुरू असल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते. शिवसेना-भाजप दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप केले जात असतांनाच आता शिवसेनेच्या आमदाराने देखील चिथावणीखोर वक्तव्य करत नव्या वादाला सुरूवात केली आहे. आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणे यांना आव्हान देतांना थेट घरात घुसून चारीमुंड्या चीत करण्याची भाषा केली आहे.

पोलीसांना बाजूला करा..

एवढेच नाही तर पोलिसांना बाजूला करा, राणेंचा कोथळाच बाहेर काढतो, असे गंभीर विधान जाहीररित्या केले आहे. बांगर म्हणाले, या हरामखोर नारायण राणेंना मला संदेश द्यायचा आहे, तु काय सांगतो कुठे यायचं कुठे यायंच. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलिस प्रोटेक्शन जरा बाजूला करं, हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा एकटा येऊन जर तुला चारीमुंड्याचीत नाही केलं, तुझा कोथळा जर बाहे नाही काढला, तर संतोष बांगर नावं सांगणार नाही, असे प्रक्षोभक विधान बांगर यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in