पावसाचा दणका, रात्री वाळू उपसा करणारे तीस टिप्पर नदीपात्रातच..

चानक नदीपात्रात पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे सर्व टिप्परच्या चालकांनी टिप्पर नदीतच उभे ठेवून नदीबाहेर पळ काढला.
Sand Mafiya, Tipper in River News Jalna
Sand Mafiya, Tipper in River News Jalna

जालना ः रात्रीचा वैध आणि अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना पावसाने चांगलाच दणका दिला. नदीपात्रातील वाढलेल्या पाण्यामुळे मंठा तालुक्यातील सासखेडा आणि बुलडाणा जिल्ह्यातील सावरगाव तेलीगावासह,वाघाळा येथील पूर्णा नदीपात्रात वाळू माफियांचे तब्बल तीस  टिप्पर अडकले आहेत. (Rain hit the sand mafia, 30 tippers pulling sand at night in the river) अजूनही नदीपात्रातील पाणी कमी झाले नसल्याने हे सर्व टिप्पर नदीपात्रातच आहेत. हे टिप्पर बाहेर काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

वाळु पट्यांचा लिलाव रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा करून ती विकली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात व आजुबाजूच्या नदीपात्रतून रात्री बे रात्री वाळू उपसा करून त्याची वाहतूक होत आहे. (Sand Mafiya)मात्र हे रात्री बे रात्री वाळू उपसा करणे माफियांच्या चांगलेच अंगलट आले आहे. वाळू उपसा करण्यासाठी गेलेले तीस टिप्पर अचानक आलेल्या पावसामुळे नदीपात्रातच अडकून पडल्याचे समोर आले आहे. बुलडाणा आणि जालना जिल्ह्याजील पुर्णा नदीपात्रत हे टिप्पर अडकून पडले आहेत.

प्रवाह वाढला..

मंठा तालुक्यातील सासखेडा  येथे अंदाजे ६ आणि येथुन जवळच असलेल्या बुलढाण्यातील सावरगाव तेली येथे १६ हायवा नदीपात्रात अडकून पडल्याची माहिती आहे.  या पैकी काही ठिकाणाहून वाळू उपशाला परवानगी असून काही ठिकाणी नाही. मात्र पूर्णा नदीपात्रातून उपशाला परवानगी नसताना देखील  उपसा सुरू होता.

वाळू माफिया पूर्णा नदीपात्रातील वाळू रात्री उपसून ती  नदीकाठी आणून साठवणूक करून ठेवतात. नंतर दिवसभर ती वाळू विकली जाते. काल रात्री या टिप्परमध्ये वाळू भरली असताना अचानक नदीपात्रात पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे सर्व टिप्परच्या चालकांनी टिप्पर नदीतच उभे ठेवून नदीबाहेर पळ काढला. त्यामुळे हे सर्व ३० टिप्पर नदीपात्रात अडकले.आज दिवसभरात यातील काही  टिप्पर बाहेर काढण्यात यश आले. तर इतरही वाहनांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.

सात-आठ चालकही अडकले. पण..

वाळु उपसा करणाऱ्या टिप्परच्या चालकांपैकी सात ते आठ चालक देखील नदीपात्रात अडकले होते. मात्र त्यांना तातडीने बाहेर  काढण्यात आले. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरू नसल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाचे मात्र यामुळे पितळ उघडे पडल्याची चर्चा या निमित्ताने सुरू होती.

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com