पदभार सोडण्याआधी मोक्षदा पाटील यांची पोलिस कर्मचाऱ्यांना अनोखी भेट; १८३ अंमलदारांना पदोन्नती..

औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच इतक्या मोठया प्रमाणात पोलीस अंमलदार यांची पदोन्नती एकाच वेळेस झाली आहे.
पदभार सोडण्याआधी मोक्षदा पाटील यांची पोलिस कर्मचाऱ्यांना अनोखी भेट; १८३ अंमलदारांना पदोन्नती..
Aurangabad Gramin Police Pramotion News

औरंगाबाद ः औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयातील १८३ पोलीस अमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. (Promotion to 183 police officers) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायाच्या अधिन राहून ही पदोन्नती देण्यात आली असून हे सर्व अंमलदार आता पोलिस नाईक, हेड काॅन्सटेबल, व सहायक्क फौजदार बनल आहेत.  

नुकतीच लोहमार्ग पोलिस अधिक्षक म्हणून बदली झालेल्या ग्रामीणच्या एसपी मोक्षदा पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी दिलेली अनोखी भेट ठरली आहे. (Sp Mokshada Patil Aurangabad Rural) पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे ही पदोन्नती समितीने पात्र  ठरविलेल्या पोलीस अंमलदार यांना सेवाजेष्ठतेनुसार रिक्त असलेल्या पदावर देण्याचा निर्णय  मोक्षदा पाटी यांनी घेतला.

पदोन्नती हा कोणत्याही सेवेत कार्यरत असणा-या व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा व आनंदाचा क्षण असतो. औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच इतक्या मोठया प्रमाणात पोलीस अंमलदार यांची पदोन्नती एकाच वेळेस झाली आहे. या गणेशत्सोवात पोलीस अंमलदार यांना पदोन्नती मिळाल्याने पोलिस दालात आनंदाचे वातावरण आहे.

औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र पोलीस अंमलदार यांना प्रमोशन देण्यात आले असून यामध्ये ७५ पोलीस शिपाई हे पोलीस नाईक, ६१ पोलीस नाईक हेड कॉन्सटेबल, तर  ४७ पोलीस हेडकॉन्सटेबल सहाय्यक फौजदार बनले आहेत. पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अंमलदार यांचे मोक्षदा पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in