परभणीत उभारला जातोय चोवीस तासात १२ लाख लिटर ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प

संपूर्ण प्लॅन्टच्या साहित्याची जोडणी करण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर पुढील सात ते आठ दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित होईल.
Parbhani Oxyegen Plant- Collector Mugalikar News
Parbhani Oxyegen Plant- Collector Mugalikar News

परभणी : कोरोनावर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरून राज्यात राजकारण सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी एक सुखद बातमी आली आहे. परभणी येथील जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये ओझोनायझेशनव्दारे ऑक्सीजन निर्मिती सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी प्लॅन्ट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून एका तासाला ५० हजार लिटर म्हणजे चोवीस तासात तब्बल १२ लाख लिटर ऑक्सीजनची निर्मिती याद्वारे होणार आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात मृत्युदर ही वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ऑक्सीजन अभावी कुणाचा मृत्यु होऊ नये यासाठी जिल्ह्यात ऑक्सीजन प्रकल्प उभारणीची संकल्पना समोर आली.  परळी वैजनाथ (जि.बीड) येथील औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट परभणीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्प उभारणीसाठीचे  साहित्य रविवारी रात्री परभणीत दाखल झाले. त्यानंतर तातडीने याची जोडणी करण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे लक्ष ठेवून आहेत. हा प्लॅन्ट येत्या सात ते आठ दिवसात कार्यान्वित होईल असे सांगितले जाते. संपूर्ण प्लॅन्टच्या साहित्याची जोडणी करण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर पुढील सात ते आठ दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित होऊन हवेद्वारे ऑक्सीजनची निर्मिती केली जाते.

तिसरा प्रकल्प

परभणी शहरात यापूर्वी ऑक्सीजन निर्मितीचे दोन प्लॅन्ट होते. त्यातील एक औद्योगिक वसाहतीमध्ये खासगी तत्वावर चालणारा आहे. तर दुसरा जिल्हा शासकीय रुग्णालयात गतवर्षी उभारण्यात आलेला आहे. आता जशी रुग्ण संख्या वाढत जात आहे, त्या प्रमाणात ऑक्सीजन बेडची मागणी देखील वाढते आहे. परळी वैजनाथ (जि.बीड) येथील औष्णिक विद्युत केंद्रातून हा प्रकल्प परभणीत आणण्यात आला आहे. त्यामुळे आता परभणी शहरातील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची संख्या तीन झाली आहे.

दर तासाला ५० हजार लिटर ऑक्सीजन या प्लॅन्टद्वारे तयार केला जावू शकते. यासाठी दोन १० हजार किलोलिटरच्या टाक्या आणण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर इतर साहित्य देखील आले आहे. अवघ्या सात ते आठ दिवसात याद्वारे ऑक्सीजन निर्मिती होऊ शकेल, असे  जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com