प्रितम मुंडे दोन महिन्यानंतर मतदारसंघात आल्या..

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हाही येता आले असते, परवानगी काढता आली असती. पण बाहेरून आलेल्या लोकांमुळे नव्या शहरात व गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे एक डॉक्टर म्हणून मी खबरदारी घेतली.
mp pritam munde gome after two month in beed news
mp pritam munde gome after two month in beed news

औरंगाबादः बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे अखेर दोन महिन्यानंतर मतदारसंघात आल्या आहेत. जिल्ह्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतांना खासदार मात्र गायब असल्याची टिका लोकांकडून केली जात होती. त्यांनतर २६ मे रोजी प्रितम मुंडे बीड जिल्ह्यात आल्या. आपण मतदारसंघात नसलो तरी फोनवरुन पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून लोकांना मदत करत होतो, त्यांचे प्रश्न सोडवत होतो, असे स्पष्टीकरण देखील प्रितम मुंडे यांनी दिले. 

बीडच्या भाजप खासदार प्रितम मुंडे कोरोनाच्या काळात मतदारसंघात न फिरकल्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजीचा सुर जिल्ह्यातील लोकांमधून उमटत होता. सोशल मिडियावर देखील बीडच्या खासदार कुठे आहेत? असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात होते. अखेर दोन महिन्यांनी जिल्ह्यात कोरोनाचे ५५ रुग्ण असतांना प्रितम मुंडे नुकत्याच बीडमध्ये परतल्या आहेत. यावेळी आपण उशीरा येण्यामागचे कारणही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

२३ मार्चपर्यंत संसदेचे अधिवेशन सुरु असल्यामुळे मी दिल्लीतच होते, त्यांनतर मुंबईत आले आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मुंबईच्या ज्या वरळी भागात मी राहते तो रेडझोनमध्ये होता. तर त्यावेळी बीड जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त होता, त्यामुळे येणे टाळले.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हाही येता आले असते, परवानगी काढता आली असती. पण बाहेरून आलेल्या लोकांमुळे नव्या शहरात व गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे एक डॉक्टर म्हणून मी खबरदारी घेतली.

बीडमध्ये येण्यासाठी परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यालाही आठवडाभराचा कालावधी लागला, आणि आता परवानगी मिळाल्यानंतर मी बीडमध्ये आले आहे. मी मतदारसंघात नव्हते तरी फोनवरून कोरोनाचा आढावा आणि आवश्यक त्या सूचना प्रशासनाला करत होते.

या शिवाय लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून काम करत होते. त्यांचे मला मनापासून आभार मानायचे आहे. कोरोनाचे संकट मोठे असले तरी घाबरून जाऊ नका, योग्य काळजी घ्या, आपण कोरोनाला निश्चितच पराभूत करू, असे आवाहन देखील या निमित्ताने खासदार प्रितम मुंडे यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com