राजकारणात साम, दाम, दंड, भेद वापरावेच लागतात; संजना जाधव यांचा इशारा कुणाला..

ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन- संजना यांच्या पॅनलमध्ये झालेली लढाई आणि त्यानंतर सध्या तालुक्यात सुरू असलेले राजकारण पाहता संजना जाधव यांनी तालुक्यात येऊन कार्यकर्तांशी साधलेला संवाद महत्वाचा समजला जातो.
Ex Mla Harshvardhan Jadhav- Sanjana Jadhav political News Aurangabad
Ex Mla Harshvardhan Jadhav- Sanjana Jadhav political News Aurangabad

कन्नड ःबाजार समितीमुळे मी राजकारण शिकले, फक्त गोड बोलून राजकारण होत नाही. राजकारणात साम, दाम, दंड, भेद या अस्त्रांचा वापर करावाच लागतो, असे सूचक विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी केले आहे. कन्नड येथील एका सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. संजना जाधव यांचा हा इशारा नेमका कुणाला होता? याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आपली मैत्रीण ईशा झा यांच्या सोबत कन्नड-सोयगांव मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. आपल्या राजकारणाची  दुसरी इनिंग त्यांनी झा यांच्या सोबत सुरू केल्याचे आणि त्याला कन्नडवासियांनी आशिर्वाद द्यावा, अशी अपेक्षा जाधव कुटुंबाकडून व्यक्त होत आहे. तालुक्याच्या राजकारणा ईशा झा यांची एन्ट्री झाल्यानंतर संजना जाधव नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

कोरोना नंतर तब्बल वर्षभराने संजना जाधव कन्नडमध्ये आल्या. कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्या गटाचे प्रकाश घुले हे सभापती झाले. यानिमित्ताने संजना जाधव यांनी घुले यांचा सत्कार केला. तालुक्यातील राजकीय घडामोडी आणि हर्षवर्धन जाधव यांच्याकडून ईशा झा यांच्यासोबत सुरू झालेले दौरे पाहता संजना जाधव नेमकं काय बोलतात याची उत्सूकता संगळ्यांनाच लागली होती. पण वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या संजना जाधव यांनी थेट आरोप किंवा टीका न करता समझने वाले को इशारा काफी प्रमाणे सूचक विधान केले.

संजना जाधव म्हणाल्या, गेल्या दीड वर्षांपासून मी घरीच बसून होते. या काळात मला अनेकांनी तालुक्यासाठी राजकारणात येण्याचे सुचवले, विनंती केली. पण वेळ आली तेव्हा मी माझा निर्णय नक्कीच कळवेल, मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

बाजार समितीत प्रकाश घुले यांना उशिरा न्याय मिळाला. युसूफ दादा यांच्या प्रयत्नाने ते सभापती होऊ शकले. बाजार समितीमुळे मी राजकारण शिकले. फक्त गोड बोलूल राजकारण होत नाही, तर राजकारणात साम दाम दंड भेद वापरावे लागते, हे मी बाजार समितीतून शिकले. गेल्या १८ वर्षात मी तालुक्यातील प्रत्येक गावात,वाड्या वस्त्यांवर भेटी दिल्या. नगर पालिका निवडणुकीत शहर पिंजून काढले. तालुक्यातील नागरिकांकडून मला भरभरून प्रेम मिळाल्याचेही संजना जाधव म्हणाल्या.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा झालेला पराभव, त्यांनतर जाधव-दानवे कुटुंबाचे ताणले गेलेले कौटुंबिक संबंध, जाधव यांना पुण्यात झालेली मारहाण, तुरुंगवास, दरम्यान झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन- संजना यांच्या पॅनलमध्ये झालेली लढाई आणि त्यानंतर सध्या तालुक्यात सुरू असलेले राजकारण पाहता संजना जाधव यांनी तालुक्यात येऊन कार्यकर्तांशी साधलेला संवाद महत्वाचा समजला जातो.

संजना जाधव यांनी आपल्या भाषणातून समर्थकांना बळ तर दिलेच, पण हर्षवर्धन जाधव यांना देखील सूचक इशारा दिल्याचे यावरून दिसते. त्यामुळे येणाऱ्या काळात हर्षवर्धन-ईशा- झा विरुध्द संजना असा संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com