पंचायत समिती सदस्य ते राष्ट्रीय काॅंग्रेसचे नेते: सातव यांचा राजकीय प्रवास

राहुल गांधी यांनी सातव यांच्यावर त्यांची गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्ती करत सोपवली होती.
Congress Mp Rajiv Satav political Journey News Aurangabad
Congress Mp Rajiv Satav political Journey News Aurangabad

औरंगाबाद ः मराठवाड्याच्या हिंगोली सारख्या जिल्ह्यातून देशाच्या राष्ट्रीय राजकारणा आपली छाप उमटवणारे काॅंग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे अवघ्या वयाच्या ४७ व्या वर्षी झालेले निधन मनाला चटका लावणारे ठरले. (Political journey of Panchayat Samiti member to National Congress leader Satav) २१ सप्टेंबर १९७४ रोजी जन्मलेल्या सातव यांची कोरोना विरुद्ध सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याच्या म्हसवद सारख्या छोट्या गावातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात करणारे सातव हे देशात  सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या राष्ट्रीय काॅंग्रेसचे एक महत्वाचे नेते व पदाधिकारी होते. (The political journey was astounding and a guide for the younger generation.)  त्यांचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा आणि तरूण पिढीला मार्गदर्शक ठरावा असाच होता.

कळमनुरी तालुक्यातील म्हसवद येथील पंचायत समिती निवडणूकीपासन सातव यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले. (After the Panchayat Samiti elections, Satav took the first step in politics. More about after) पंचायत समिती सदस्य म्हणून निवडूण आले आणि सभापती होण्याचा मान देखील त्यांना मिळाला.

त्यांनतर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ते निवडूण आले आणि कृषी सभापती म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. राजकारणात सुरूवातीपासूनच यश मिळत गेल्याने सातव यांनी मग मागे वळून पाहिलेच नाही.  

जिल्हा परिषद सदस्य म्हणून ग्रामीण भागातील राजकारण आणि सामन्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा अनुभव कामी आला आणि काॅग्रेस पक्षाने त्यांना कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. (The Congress party nominated him from Kalamanuri assembly constituency.) या निवडणुकीतही सातव यांनी विजय मिळवत राज्याच्या राजकारणात प्रवेश केला.

पदांपेक्षा पक्ष कार्याला महत्व..

राजकीय पद मिळत असतांनाच त्यांनी काॅंग्रेस पक्षात देखील महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. प्रदेश युवक काॅंग्रेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी राज्यात युवक काॅंग्रेसची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. (Satav's work caught the eye of Congress leader Rahul Gandhi and Satav became his loyalist and fan.) सातव यांचे काम काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नजरेत भरले आणि पाहता पाहता सातव हे त्यांचे विश्वासू आणि चाहते बनले.

कळमनुरी मतदारसंघातून दोनवेळा विधानसभेवर निवडूण गेल्यानंतर राहुल गांधी यांनी सातव यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांना देशाच्या राजकारणात नेले. शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा सातव यांनी थोडक्यात पराभव केला होता.

लोकसभेत काॅंग्रेसच्या ध्येयधोरणानूसार अभ्यासपूर्ण भूमिका मांडत, तर कधी आक्रमक होत सातव यांनी आपल्या कामाची चुणूक अनेकदा दाखवून दिली होती. (While pursuing a pragmatic role in line with the goals of the Congress, Satav was often seen as a scapegoat for his work.) दिल्लीत काॅंग्रेस नेत्या, सोनिया गांधी, राहुल गांधी व इतर वरिष्ठ नेत्यासोबत सातव यांचा संपर्क वाढला, विश्वास वाढला आणि त्यांच्यावर पक्षाने एकापाठोपाठ एक अशा महत्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवल्या.

गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर पक्षाने प्रभारी म्हणून जबाबदारी टाकल्यामुळे ते २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवू शकले नव्हते. परंतु राहुल गांधी यांनी त्यांना राज्यसभेवर घेत पुन्हा संधी दिली. 

राहुल गांधीचे विश्वासू..

राजीव सातव यांनी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा विश्वास संपादन केला होता. सातव यांच्या कामाने राहुल गांधी प्रभावित झाल्यामुळे त्यांनी सातव यांच्या मोठ्या जबादाऱ्या टाकल्या आणि सातव यांनी देखील त्या यशस्वीपणे पार पाडल्या. (Rajiv Satav had earned the trust of Congress leader Rahul Gandhi.) गुजरात राज्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी आणि कॉंग्रेस कार्यकारी समितीचे कायमस्वरुपी सदस्य असलेल्या सातव या पक्षात नेहमीच मानाचे पान मिळाले.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सर्वोच्च निर्णय प्रक्रियेच्या समितीचे सातव महत्वाचा भाग होते. देशात भाजप विरुद्ध काॅंग्रेस असा संघर्ष पेटला तेव्हा मोंदीच्या गुजरातमध्ये जाऊन काॅंग्रेस बळकट करण्याची मोठी जबाबदारी राहुल गांधी यांनी सातव यांच्यावर त्यांची गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्ती करत सोपवली होती.

या निवडणुकीत गुजरामध्ये पक्षाला मर्यादित यश मिळाले असले तरी पक्ष नेतृत्वाने सातव यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेतली. सौराष्ट्र प्रांताचे प्रभारी, अखिल भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसचे सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या. 

राजीव सातव हे पंजाब विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सदस्यही होते.  फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ पर्यंत भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. (Rajiv Satav was also a member of the screening committee set up for the 2017 Punjab Assembly elections.) भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविण्यापूर्वी ते महाराष्ट्राचेही अध्यक्ष होते.

चारवेळा संसद रत्न..

२०१८ च्या काॅंग्रेसच्या मसुदा समिती, उपसमूह: राजकीय समिती आणि घटना दुरुस्ती समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  राजीव सातव हे भारतीय - युरोपियन युनियन संसदीय मैत्री गट आणि भारतीय संसदीय गट यांचे सदस्य म्हणून देखील कार्यरत होते.

खासदार म्हणून त्यांची दोन्ही सभागृहातील कामगिरी उल्लेखनीय होती. आपली भूमिका परखडपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. आधार विधेयक, कौशल्य विकास, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग रद्दबातल विधेयक, घटनात्मक दुरुस्ती या विषयावर त्यांनी सभागृहा काॅंग्ेसची भूमिका जोरकसपणे मांडली होती.

त्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या संसदीय वादविवादामध्ये कृषी संकट, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे, अनुदानाची पूरक मागणी, आयआयएम विधेयक, कंपन्या कायदा (दुरुस्ती) विधेयक आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर व्यक्त केलेले मत प्रभावी ठरले होते.

पक्षाने त्यांची संसदेच्या अनेक समित्यांवर देखील नियुक्ती केली होती. ज्यामध्ये  रेल्वेची स्थायी समिती, संरक्षण विषयक स्थायी समिती, इतर मागासवर्गीयांच्या कल्याण समिती, भूसंपादन विधेयकी संयुक्त संसदीय समिती आणि युवा कार्य व क्रीडाविषयक सल्लागार समितीचा समावेश आहे.

राजीव सातव हे कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत संसदीय समितीचे सदस्यही  होते. संसद अधिवेशन व संसदीय समितीच्या बैठकीत विधानमंडळ व्यवसायाची तपासणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते.  राजीव सातव यांना त्यांच्या संसदेतील उत्कृ्ष्ट कामगिरीसाठी सलग चार वेळा संसदरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com