कोविड सेंटरमधून रेमडेसिविर चोरून विकणारी परिचारिका पोलिसांच्या जाळ्यात

इंजेक्शनची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पथकातील पोलिस कर्मचारी संतोष सानप यांनी इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्यास गाठले.
Parbhani Covied Center News- Nurs Trap- Remdisiver
Parbhani Covied Center News- Nurs Trap- Remdisiver

परभणी ः शासकीय कोविड सेंटरमधून रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरून ते काळ्या बाजारात चढ्या भावाने विकणाऱ्या एका परिचारिकेसह खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ७५ हजार रुपये, दोन मोबाईल व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

परभणी शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढती असून रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा गैरफायदा घेवून अनेकजण इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखासह अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे.

इंजेक्शनची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पथकातील पोलिस कर्मचारी संतोष सानप यांनी इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्यास गाठले व नातेवाईकासाठी इंजेक्शनची नितांत गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी इंजेक्शनसाठी १५ हजार रुपये लागतील असे संबधित व्यक्तिने सांगितले.

त्यानुसार तीस हजार रुपयांत दोन इंजेक्शनचा व्यवहार ठरवला. ती घेण्यासाठी बेलेश्वर मंदीर परिसरात (नांदखेडा रोड) दुपारी तीनला या, असे संबंधित व्यक्तिने सांगितले. त्यानुसार संतोष सानप हे दुपारी तीनला नांदखेडा रोड परिसरात गेले. तेथे आधीच पोलिस पथक दबा धरून बसले होते. इंजेक्शन संदर्भात चर्चा सुरु असतानाच संशयित व्यक्तीस पथकाने ताब्यात घेतले.

दत्ता शिवाजी भालेराव (वय २१, नर्सिंग स्टॉफ, डेंटल कॉलेज, पाथरी रोड, परभणी) असे संशयिताचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, फौजदार संतोष सिरसेवाड, पोलिस कर्मचारी जक्केवाड, मधूकर चट्टे, तुपसुंदरे, खुपसे, चव्हाण, मोबीन, अझहर शेख, दिलावर खान, आव्हाड, निळे आदी या कारवाईत सहभागी झाले.

सात इंजेक्शन चोरल्याची कबुली

जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका निता केशव काळे या जिल्हा परिषद कोविड सेंटरमध्ये कार्यरत आहेत. कोविड सेंटरमधून इंजेक्शन चोरुन त्या दत्ता भालेराव यास बारा हजार रुपयांना विकत असत. पथकाने निता काळे यांच्या घरी तपासणी केली असता ७५ हजार रुपये रोख सापडले. कोविड सेंटरमधून आतापर्यंत सात इंजेक्शन चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. या परिचारिकेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी परभणी पोलिस दलाशी (९६७३८८८८६८ व ९४२२६४४७४५) संपर्क साधावा., असे आवाहन पोलिस अधिक्षकजयंत मीना यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com