पोलिस दबावाखाली गुन्हे दाखल करत आहेत; पण मी घाबणार नाही..

मराठवाड्यातील प्रश्न मांडायचे नाही तर मग इतर लोकप्रतिनिधींसारखे घरात बसून राहायचे का? ते मला शक्य नाही.
पोलिस दबावाखाली गुन्हे दाखल करत आहेत; पण मी घाबणार नाही..
Mim Mp Imtiaz Jalil News Aurangabad

औरंगाबाद ः जनतेने मला त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे पोलिसांनी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले, तरी मी रस्त्यावर येऊन आंदोलन करणे थांबवणार नाही. पोलिस दबावाखाली आमच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीच्या कारवाया करत आहेत,उद्या माझ्यावरही करतील. (Police are filing crimes under pressure; But I will not stop.) पण म्हणून मी घाबरून पोलिसांच्या किंवा सत्ताधारी नेत्यांच्या पाया पडेल, असे जर कुणाला वाटत असेल तर ते कदापी शक्य नाही, अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर निशाणा साधला.

स्वातंत्र्यदिनी मराठवाडा क्रीडा विद्यापीठ आम्हाला परत द्या, अशी मागणी करत इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. (Mim Mp Imtiaz Jalil Aurangabad) या प्रकरणी आज पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्यासह २४ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावर इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत औरंगाबादेतील पोलिस व प्रशासनातील काही अधिकारी यांची सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप केला.

`सरकारनामा`शी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, पोलिस कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत हे वारवांर सिद्ध झाले आहे. माझ्या एका कार्यकर्त्यावर तर तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. उद्या माझ्यावर देखील अशाप्रकारची कारवाई झाली तर नवल वाटायला नको, एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दबाव आहे. आमच्या सक्रीय कार्यकर्त्याना अडकवण्याचा हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.

इम्तियाज जलील आणि एमआयएमच्या बाबतीत एवढे दक्ष राहणारे पोलिस आणि जिल्हा प्रशासन जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे जाहीर कार्यक्रम होतात, तेव्हा गप्प का? असतात. भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड सध्या जनआशिर्वाद यात्रा काढत आहे, उद्या रावसाहेब दानवे देखील मतदासंघात यात्रा काढणार आहेत.

आज काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मोठा मेळावा घेतला. तिथेही शेकडोंची गर्दी जमा झाली होती. मग आमच्यावर गुन्हे दाखल करणारे पोलिस या पक्षाच्या नेत्यांवर देखील एवढ्याच झटपट कारवाई करणार आहेत का? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

मी पत्रकार आहे, त्यामुळे शहरातील पोलिसांना कुठून, कसे, काय मिळते? हे जेव्हा मी जनतेमध्ये जाऊन सांगायला लागेल तेव्हा काय होईल? असा इशारा देखील इम्तियाज यांनी दिला. जनतेचे, मराठवाड्यातील प्रश्न मांडायचे नाही तर मग इतर लोकप्रतिनिधींसारखे घरात बसून राहायचे का? ते मला शक्य नाही. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले, तरी मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारच, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in