लोक समजूतदार झालेत, पोलीस आयुक्तांकडून औरंगाबादकरांना शाबसकी..

नागरिकांचा प्रतिसाद खरंच वाखाणण्याजोगा आहे. पुढील काही दिवस लोकांनी असाच संयम आणि काळजी घेत घराबाहेर पडणे टाळले, तर निश्चितच आपण कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात आणि वाढत्या रुग्णांची संख्या घटवण्यात निश्चितच यशस्वी होऊ.
police commissinor congatulate aurangabadkar news
police commissinor congatulate aurangabadkar news

औरंगाबादः कोरोनाचा संसर्ग रोखून रुग्ण संख्या कमी करण्याचे उदिष्ठ घेऊन करण्यात आलेला कडक लॉकडाऊन सलग तिसऱ्या दिवशीही यशस्वी झाला. लोकांनी स्वतःला घरात लॉकडाऊन करुन घेतल्याने पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि महापालिकेचे कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरण्यास मोठी मदत होत आहे. लॉकडाऊनला लोकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलीस आयुक्त चिरंजवी प्रसाद हे खूष आहेत. ‘लोक समजुतदार झाले आहेत', अशा शब्दांत त्यांनी औरंगाबादकरांना शाबसकी दिली आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तसेच मृतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोनाचा हा वाढता संसर्ग रोखण्याचे आव्हान घेत शहरात १० ते १८ जुलै असा नऊ दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात आला. आज तिसऱ्या दिवशी शहरवासियांनी लॉकडाऊनला उत्सफूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले, नागरिकांचा प्रतिसाद खरंच वाखाणण्याजोगा आहे. पुढील काही दिवस लोकांनी असाच संयम आणि काळजी घेत घराबाहेर पडणे टाळले, तर निश्चितच आपण कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात आणि वाढत्या रुग्णांची संख्या घटवण्यात निश्चितच यशस्वी होऊ.

लोकांनी दाखवलेला समजुतदारपणा कौतुकास्पद आहे. तीन दिवस नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. दुचाकी वाहनांवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय देखील योग्य ठरला आहे. पुर्वीच्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकीवर लोक मेडीकल किंवा अत्यावश्यक सेवेचे कारण देऊन रस्त्यावर उतरले होते.

यावेळी मात्र हे चित्र पुर्णपणे बदलले आहे. काही दिवसांतच याचे चांगले परिणाम आपल्याला दिसू लागतील, असा विश्वास देखील पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला. सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, तर येणाऱ्या काही दिवसांत आपण कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात निश्चितच यशस्वी होऊ. औरंगाबादकरांनी कडक लॉकडाऊन मनावर घेतला आहे,  पुर्वीच्या लॉकडाऊनचे आणि आताचे चित्र हे पुर्णपणे वेगळे आणि समाधान देणारे असल्याचेही चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

रुग्ण संख्या घटली..

कडक लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसायला लागले आहेत. दररोज दोनशे, अडीचशेने वाढणारी कोरोनाबाधितांची  संख्या आज बरीच घटली. दुपारपर्यंत फक्त ६६ नव्या रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८३४६ एवढी झाली आहे. यापैकी ४८३४ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ३१६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, आतापर्यंत ३५१ रुग्ण या महामारीने दगावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com