निलंगेकर भाजपच्या दोन गटाला कंटाळलेत, राष्ट्रवादीचा सक्षम पर्याय निर्माण करा..

आपल्या लोकांच्या मनात काय आहे? हेच कळले नाही तर तो परिवार कसला. कुणावर अन्याय झाला तर न्याय देण्याची खबरदारी आम्ही घेऊ.
Ncp Leader Jayant Patil News Latur-Nilanga
Ncp Leader Jayant Patil News Latur-Nilanga

निलंगा ः राष्ट्रवादीच्या परिवार संवाद दौऱ्यांच्या निमित्ताने झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलंग्यातील भाजपच्या दोन गटांचा उल्लेख केला. (People are fed up with two groups of BJP, create a viable alternative to NCP, Said jayant Patil)  भाजपचे आमदार संभाजीपाटील निंलगेकर व  औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे दोन गट निलंग्यात सघ्या एकमेकांना शह देण्याच्या प्रयत्नात आहेत. नेमका हाच मुद्दा हेरत लोक भाजपच्या गटा-तटाला कंटाळळे आहेत, त्यांना राष्ट्रवादीच्या रुपाने नवा सक्षम पर्याय द्या,असे आवाहन पाटील यांनी या बैठकीत केले.

सामान्य घरातली माणसं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जावू शकतात, ही लोकशाहीची ताकद आहे. याच लोकशाहीच्या तत्वावर आपला पक्ष जनसामान्यांमध्ये वाढू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Ncp State President Jayant Patil)  लातूर जिल्ह्यातील निलंगा व शिरुर अनंतपाळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा पाटील यांनी घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना  जयंत पाटील म्हणाले, लोकांचे प्रश्न जर आपण हातात घेतले तर आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचेल. आपण कायम जर लोकांसाठी लढतोय हे चित्र तयार केले तरच पक्ष बळकट होईल.

यासाठी बुथ कमिट्या मजबूत करा, याच बुथ कमिट्या उद्या आपला पक्ष सक्षमपणे उभा करतील. राज्यात विविध समाजघटकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यासोबतच पिक-बियांणांचे प्रश्न आहेत, आपण ते मांडले पाहिजेत.  हा परिवार संवाद त्यासाठीच आयोजित करण्यात आला आहे. ज्या परिवारात संवाद नसतो तो परिवार पुढे जात नाही. आपल्या लोकांच्या मनात काय आहे? हेच कळले नाही तर तो परिवार कसला. कुणावर अन्याय झाला तर न्याय देण्याची खबरदारी आम्ही घेऊ, अशी ग्वाही देखील जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

निलंगा मतदारसंघातील भाजपमधील दोन गटांना लोकं कंटाळली असल्याने आपण पर्याय उभा करण्याचे काम या मतदारसंघात निर्माण करु शकतो. बुथ कमिट्या तयार करा, त्यासाठी एक शिबिर आयोजित करण्यात येईल. पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले तर पक्ष निश्चित विचार करतो, असा आत्मविश्वासही पाटील यांनी  कार्यकर्त्यांना दिला. 

यावेळी सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, विक्रम काळे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर आदींची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com