पवार कुटुंबाचे प्रत्येक राजकीय पक्ष, नेत्यांशी उत्तम संबंध.. - Pawar family has good relations with every political party and leader. | Politics Marathi News - Sarkarnama

पवार कुटुंबाचे प्रत्येक राजकीय पक्ष, नेत्यांशी उत्तम संबंध..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जुलै 2021

मुख्यमंत्री पदाला एक वेगळा वारसा आहे. एका जेंडरमध्ये त्यास अडकवून ठेवणे योग्य होणार नाही.

औरंगाबाद :पवार कुटुंबाचे प्रत्येक राजकीय पक्ष, विचारधारा असलेल्या लोकांशी, राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध आहे. ही महाराष्ट्राची सांस्कृती आहे. मात्र आता कुठे तरी ही संस्कृती बिघडविण्याचे काम काही काळात झाले होते. (Pawar family has good relations with every political party and leader.) त्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सुधारणा झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाईन संवादमालेत सप्रिया सुळे यांचे ‘परिवर्तनवादी महाराष्ट्र’ या विषयावर रविवारी व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. (Ncp Leader and Mp Supriya Sule) दिल्लीत नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीनंतर राज्यात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या. (Woman cyiber Crime Maharashtra) राष्ट्रवादी-भाजप युती होणार का? असे देखील बोलले जाऊ लागले, यावर सुळे यांनी वरील विधान करत पुर्णविराम लावला.

सायबर क्राईम आणि त्याचा महिलांना होणारा सर्वाधिक त्रास यावर सुळे म्हणाल्या,सध्या सायबर क्राईमचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या क्राईमचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. महिलांना अगोदरच अनेक त्रासातुन जावे लागत होते. त्यात या क्राईमचा समोवश  झाला आहे.

महिलांना सध्या सर्वाधिक सायबर क्राईमचा त्रास होत आहे. या त्रासातुन त्यांना वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातुन यशस्वीनी हा उपक्रम महिलांसाठी राबविण्यात येतो. त्यात महिलांवरील अत्यांचार कमी करण्यासाठी काम केले जाते. यातील सहभाग अधिक प्रमाणात वाढविण्याची गरज  आहे.

कृषी कायद्यावर संसदेत व्यापक चर्चा होण्याची गरत होती. मात्र ती घेण्यात आली नाही. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याचा विचार केला पाहिजे. उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन अधिक महत्वाचे आहे. त्यात याविषयीचे प्रश्न उपस्थित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाकडे मी वेगळ्या दृष्टीने पाहते..

महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे महाराष्ट्र पाहतो, असा प्रश्न  सुळे यांना विचारला असता, त्यांनी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहते असे सांगितले. मुख्यमंत्री पदाला एक वेगळा वारसा आहे. एका जेंडरमध्ये त्यास अडकवून ठेवणे योग्य होणार नाही असे, सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य टाळले.

शिक्षण हा अतिशय संवेदनशिल आणि गंभीर विषय आहे. तो हलक्याने घेऊ नये. राज्य शासनासह केंद्र शासनानेही हा विषय अधिक जबाबदारीने हाताळला पाहिजे.  तत्कालीन आघाडी सरकारने विनाअनुदानितच्या अगोदर असलेला कायम हा शब्द काढला. सध्याचे महाविकास आघाडी सरकारही याविषयी संवेदनशिल असल्याचे सुळे यांनी सांगितले.

हे ही वाचा ः अनिल देशमुखांसमोरील अडचणीत भर, निकटवर्तीयाला ईडीने घेतले ताब्यात..

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख