पटोलेंचा स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी; शिवसेनेचा काॅंग्रेसला टोला.. - Patole's slogan of self-reliance to please the workers; Shiv Sena's Khaire's attack on Congress .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

पटोलेंचा स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी; शिवसेनेचा काॅंग्रेसला टोला..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 जून 2021

राजकारणात असे चालायचेच. त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल असे वाटत नाही. उलट शिवसेनेसोबत राहिले तर राज्यात काँग्रेसचीही ताकद वाढेल. 

 लातूर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावरचा नारा दिला आहे. केवळ कार्यकर्त्यांना खूष करण्य़ासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तो दिला आहे, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत केली. (Patole's slogan of self-reliance to please the workers; Shiv Sena's Khaire's attack on Congress ) सोबत राहिलात तर शिवसेनेमुळे काँग्रेसची ताकद वाढले, असा टोलाही खैरे यांनी पटोलेंना लगावला.

जिल्ह्यातील शिवसेनेचा आढावा घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात खैरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. (Shivsena Leader Chandrakant Khaire) मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामुळे राज्यात कोविडची दुसरी लाट थांबवण्य़ात यश आले. या काळात शासनासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही रुग्णांना मदतीचे मोठे काम केले आहे. हीच आमची ताकद आहे.

आता कोरोना कमी झाला आहे. आगामी काळात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिकांच्या निवडणूका होत आहेत. (Congress State President Nana Patole) महाविकास आघाडी त्या लढविणार आहे. त्या आम्ही जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ( Minister Amit Deshmukh) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा दिलेला नारा हा कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी आहे. त्यात बाकी काही नाही. महामंडळ, काही पदे मिळतील का, यासाठीचे ते दबावतंत्रही असू शकते, असा चिमटाही खैरेंनी काढला.

राजकारणात असे चालायचेच. त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल असे वाटत नाही. उलट शिवसेनेसोबत राहिले तर राज्यात काँग्रेसचीही ताकद वाढेल. इंधन दरवाढ, राज्याला केंद्राकडून मिळणारा निधी, केंद्राने पाठविलेले व्हेंटिलेटर आदींवर त्यांनी भाष्य करतांना मोदी सरकारवर टीका केली.  राज्यातील विरोधी पक्षाला आंदोलनाशिवाय काही कामच नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

अमित देशमुखांनीही केले खूष...

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे काँग्रेसचे औरंगबादचे संपर्कमंत्री आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवेल असे देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यातून त्यांनी औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना तर पटोले यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना खूष केल्याचे खैरे म्हणाले.

हे ही वाचा ः एटीएम चोरांचा पाठलाग, हवेत गोळीबार, तरीही आरोपी पळाले..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख