परभणीकर जिंकले, सरकार झुकले; आंचल गोयल जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार..

राजकीय हस्तक्षेप आणि गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखत परत बोलवल्याच्या निषेधार्थ परभणीकर रस्त्यावर उतरले होते.
Anchal Goyal Now Collector Parbhani News
Anchal Goyal Now Collector Parbhani News

परभणी ः आयएएस अधिकारी  असलेल्या आंचल गोयल यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सहा दिवस परभणीत पदभार घेण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या गोयल यांना सेवानिवृत्त जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी पदभार दिला नाही. (Parbhanikar won, the government bowed; Aanchal Goyal will be appointed as the Collector. Said Nawab Malik) उलट कनिष्ठ अधिकाऱ्याकडे चार्ज देऊन ते निवृत्त झाले. अनेक आरोप-प्रत्यारोप, आणि राजकीय घडामोडीनंतर आता गोयल याच परभणीच्या जिल्हाधिकारी असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पालकमंत्री नवाब मलीक यांनी गोयल लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे मुंबईत जाहीर केले.

दरम्यान, गोयल यांना परभणीत रुजू होण्यापासून रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्याची चर्चा होती. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा या मागे हात असल्याचेही बोलले गेले. ( Ias Anchan Goyal As A parbhani Collector) या राजकीय हस्तक्षेप आणि गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखत परत बोलवल्याच्या निषेधार्थ परभणीकर रस्त्यावर उतरले होते. (Gardiuain Minister Nawab Malik, Parbhani) सोशल मिडियातून देखील याबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेर परभणीकरांच्या आंदोलनाला आणि प्रयत्नांना यश आले आहे.

आंचल गोयल या लवकरच परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी मुंबईत दिली. यानंतर परभणीत देखील एकच जल्लोष होत आहे. परभणीकर जिंकले, सरकार झुकले अशाच प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. परभणीत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना टिकू दिले जात नाही, राजकीय दबाव आणून त्यांना घालवले जाते, असा आतापर्यंतचा इतिहास आणि परभणीकरांचा आरोप होता.

दिपक मुगळीकर सेवानिवृत्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून आयएएस अधिकारी असलेल्या गोयल यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते. त्या परभणीत पदभार घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सहा दिवस परभणीत राहून देखील त्यांना पदभार देण्यात आला नव्हती. त्यानंतर २ जूलै रोजी त्यांना मुंबईत परत बोलावण्यात आले. हा प्रकार कळताच परभणीकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सोशल मिडियावर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या जागरूक नागरिक समिती स्थापन करून सामान्य परभणीकर या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते.

यातच शिवसेना खासदाराने आपली राजकीय शक्ती वापरून गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखल्याचा आरोप आणि चर्चा देखील होती. त्यामुळे याबद्दल राष्ट्रवादी, भाजप व इतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला. तर जागरूक नागरी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन सुरू केले होते. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी देखील या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

सुत्रे हलली अन् निर्णय बदलला..

पवारांनी देखील आपण मुंख्यमंत्र्यांशी बोलू असे सांगत गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखल्याबद्दल तीव्र नाराजी दर्शवली होती. त्यानंतर आता आज गोयल यांनाच परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून नेमण्यात आल्याचे व त्या लवकरच पदभार घेणार असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले. त्यामुळे परभणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून हा सर्वसामान्यांचा विजय असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

जागरूक नागरिक समितीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला लढा आणि वेगवान राजकीय घडामोडींचा हा परिपाक असल्याचेही बोलले जाते.माणिकराव कदम, माधुरीताई, राजनभाऊ आणि तमाम साथींनी आता ही ऊर्जा वाया जाणार नाही हे पहावं आणि याच ऊर्जेतून 'जागरूक नागरिक समिती' अजून वाढवावी, असे आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात हे बिगर राजकीय संघटन दहा हजार लोकांचं झालं तर खासदारच काय पण कुठलाच राजकीय नेता शिरजोरी करू शकणार नाही, असेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.  ही सुरूवात आहे, आता परभणीकर थांबणार नाहीत, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.

Edited By : Jagdish pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com