परभणी जिल्हा बॅंकेच्या मैदानात सहा आजी-माजी आमदारांसह एक माजी खासदारही

सहा उमेदवार सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता १५ जागासाठी चुरस होणार आहे. या १५ जागेसाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत.
Parbhni District Bank Election News
Parbhni District Bank Election News

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक सर्वांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. या निवडणुकीत अनेक प्रतिष्ठीतांची प्रतिष्ठा पणाला लागली असून निवडणुक चुरशीची होणार यात शंका नाही. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील चार विद्यमान आमदार, दोन माजी आमदार व एक माजी खासदार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणुक सध्या सुरु आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. ही निवडणुक परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरत आहे. कारण या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील प्रतिष्ठीत राजकारण्यानी उडी घेतलेली आहे.

बॅंकेच्या २१ संचालक पदासाठी ही निवडणुक होत आहे. त्यापैकी यापू्र्वी बिनविरोध निवड झालेल्या सहा संचालकामध्ये चार बोर्डीकर गटाचे तर दोन वरपुडकर गटाचे आहेत. त्यात बोर्डीकर गटाचे स्वतः माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, बालासाहेब देसाई (पूर्णा), आमदार तानाजी मुटकुळे (हिंगोली), भगवान सानप (गंगाखेड) तर वरपुडकर गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी, बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष पंडीतराव चोखट यांचा समावेश आहे.

हे सहाही जण सोसायटी मतदार संघातून बिनविरोध झाले निवडून आले आहेत. त्यामुळे आता १५ जागासाठी चुरस होणार आहे. या १५ जागेसाठी  ३३ उमेदवार रिंगणात आहेत. यातील सर्वच उमेदवार मात्तबर व जुने राजकारणी असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील चार विद्यमान आमदार ज्यात भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर (जिंतूर), कॉग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर (पाथरी), राष्ट्वादी कॉग्रेसचे आमदार राजू नवघरे (वसमत) व भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (हिंगोली) यांचा समावेश आहे.

तर भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर (भाजप) व माजी आमदार सुरेश देशमुख (कॉग्रेस) हे देखील मैदानात आहेत. हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने हे देखील संचालकपदासाठी निवडणुक लढवत आहेत. २१ मार्चला संचालक मंडळासाठी प्रत्यक्ष मतदान होणार असून  23 मार्चला मतमोजणीहोणार आहे. २१ मार्च रोजी सकाळी ८ ते सांयकाळी ५ या वेळेत मतदान होईल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com