ओबीसी आंदोलनात पंकजा मुंडेंची अनुपस्थिती जाणवली...

राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी बुधवारी सर्वत्र भाजपने आंदोलन केले.
ओबीसी आंदोलनात पंकजा मुंडेंची अनुपस्थिती जाणवली...
Pankaja Munde-Obc Reservation News Beed

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव व ओबीसींच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांची आंदोलनाच्या निमित्ताने अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. बुधवारी राज्यासह जिल्ह्यात आंदोलन झाले. (Pankaja Munde's absence felt in OBC movement) मात्र, मुलासोबत परदेशात असल्याने पंकजा मुंडे आंदोलनाला हजर राहू शकल्या नाहीत.

भाजपमधील ओबीसींच्या प्रमुख नेत्या आणि मास लिडर अशी पंकजा मुंडे यांची ओळख आहे. (Bjp Leader Pankaja Munde, Maharashtra) सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर भाजपने आंदोलनाची हाक दिली आणि याचे नेतृत्व पंकजा मुंडे यांनी केले. त्यांनी आंदोलनात पुण्यात सहभाग घेतला होता.

ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. या प्रश्नांबाबत विविध ठिकाणी झालेल्या मेळाव्यांतही त्या उपस्थित होत्या. दरम्यान, आता काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषीत झाल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी बुधवारी सर्वत्र भाजपने आंदोलन केले.

मात्र, पंकजा मुंडे या मुलगा आर्यमन सोबत परदेशात असल्याने त्या आंदोलनात सहभागी होऊ शकल्या नाहीत. मात्र, त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. परळीत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in