अति स्वाभिमानी स्वभावामुळे माझे नुकसान झाले..

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील माझ्या बहिणीसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे नेहमी खुले आहेत असे विधान केल्याच्या प्रश्नावर देखील, असे कुठलेही स्टेटमेंट उध्दव ठाकरे यांनी केल्याचे माझ्या ऐकण्यात नसल्याचे सांगितले. ते एक जबाबदार आणि राज्याचे महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे असे काही बोलले असते तर त्यांनी मला आधी सांगितले असते.
pankaja-munde news about reaction
pankaja-munde news about reaction

औंरगाबादः विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला तेव्हापासूनच मी मंत्री होणार, पक्षात मला मोठं पद मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या नेहमीच सुरू असतात, पण मी लोकांमधून आलेली असल्यामुळे पक्षाकडे काही मागणे हे माझ्या स्वाभिमानी स्वभावाला पटले नाही. अति स्वाभीमानी स्वभावामुळे माझे नुकसानही झाले, अशी कबुली भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलतांना दिली.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ३ जून रोजी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर प्रकाश टाकला, विधान परिषद निवडणुकीत डावलल्यापासून ते राज्यातील राजकारणावर पंकजा यांनी आपली मते मांडली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, विधान परिषदेची उमेदवारी मला मिळणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अगदी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, तेव्हापासून मी मंत्री होणार, मला पक्षात मोठे पद मिळणार, अशा चर्चा होत्या. पण लोकांमधून आलेल्या आणि स्वाभीमानी स्वभाव असल्यामुळे पक्षाकडे आपण काही मागणे हे काही मला योग्य वाटले नाही. माझ्या अति स्वाभीमानी स्वभावामुळे माझे नुकसानही झाले.

विधान परिषद निवडणुकीत माझ्यासह काही दावेदारांना तयारी करण्यास सांगितले होते. पण त्यांनतर पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला. त्यानंतर मी ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांचे अभिनंदनही केले होते. माझ्या ट्विटमधून देखील मी उमेदवारी मिळाली नाही याचा मला अजिबात धक्का बसला नसल्याचे स्पष्ट केले होते. उमेदवारी संदर्भात दिल्लीतील वरिष्ठांशी माझी चर्चा निश्चितच झाली होती. पण ती जाहीर करणार नाही.

राम शिंदेंनी माझ्यावर टिका केली नाही..

विधान परिषद निवडणुकीनंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे पंकजा म्हणाल्या. एका सालगड्याचा मुलगा मंत्री झाला, त्यानंतर विधानसभेच्या निवडणकीत मोठ्या हिंमतीने लढल्यानंतर पराभव होऊन देखील काम करत राहिला. मी दबावाचे राजकारण केले आणि माझ्या गटाच्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली असे राम शिंदे कधीही म्हणाले नाही. त्यांनी माझ्याकडे तसे स्पष्टीकरणही दिले. त्यामुळे या केवळ तुमच्या बातम्या आहेत. माझे आणि राम शिंदे यांचे कौटुंबिक आणि प्रेमाचे संबंध आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील माझ्या बहिणीसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे नेहमी खुले आहेत असे विधान केल्याच्या प्रश्नावर देखील, असे कुठलेही स्टेटमेंट उध्दव ठाकरे यांनी केल्याचे माझ्या ऐकण्यात नसल्याचे सांगितले. ते एक जबाबदार आणि राज्याचे महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे असे काही बोलले असते तर त्यांनी मला आधी सांगितले असते. 

राहिला प्रश्न चर्चेचा किंवा बोलण्याचा तर आम्ही नेहमीच बोलत असतो. शिवेसना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षातील नेत्यांशी माझी चर्चा होत असते, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या संकटात राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे सांगतानाच त्यात आणखी काही प्रमाणात सुधारणा आणि रुग्णांची वाढती संख्या पाहता अधिक बेड आणि आरोग्य सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याचे पंकजा यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटात भाजपने केलेले आंदोलन योग्य होते का या प्रश्नावर देखील सरकार आणि विरोधी पक्षाने आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली तरच समतोल राखला जातो. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपल्या ठिकाणी योग्य काम करत असल्याचे पंकजा म्हणाल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी त्यांच्यांवर प्रेम करणाऱ्यांनी घरीच त्यांना अभिवादन करून साजरी करावी. कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करावी हीच त्यांच्यासाठी खरी श्रध्दांजली ठरेल. गोपीनाथ गडावर जाण्याची परवानगी मिळाली असली, तरी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांशी बोलून निर्णय घेईन. 

कुठल्याही प्रकारे गर्दी होऊन कोरोनासाठी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येकानी घ्यावी, गोपीनाथ मुंडे साहेबांनी जी स्त्री-पुरुष समानतेची शिवकवण पुढे सुरू ठेवली, त्याची आठवण म्हणून प्रत्येक घरातील स्त्री-पुरुषाने समानतेचे प्रतिक म्हणून साहेबांच्या फोटो समोर दोन दिवे लावावेत, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी मुलाखतीत केले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com