भाजप सोडण्याबाबत पंकजा मुंडेनी केला मोठा खुलासा..

माझ्या बाबतीत अनेक बातम्या पसरवल्या जातात. पंकजा मुंडे पक्ष सोडणार, या पक्षात प्रवेश करणार, तुम्ही कोण माझ भविष्य आणि पक्ष प्रवेशाचे मुहूर्त ठरवणारे असा सवालही पंकजा यांनी केला. भारतीय जनता पक्ष हा मुंडे साहेब, प्रमोद महाजन साहेबांनी मोठा केला आहे. मी पक्ष सोडून जाव यासाठीच अशा बातम्या पसरवल्या जात आहेत.
pankja munde stment on his party news
pankja munde stment on his party news

औरंगाबादः आपल्या पाठीचा कणा जरा कडक आहे तो वाकणार नाही, गोपीनाथ मुंडेंनी आपल्याला स्वाभीमानाने जगायला शिकवले आहे. त्यामुळे पंकजा मुंडेकडे पद नाही, त्या काय करणार, कोणाच्या दारात जाणार असे प्रश्न तुमच्या मनात असतील. पण मी संघर्षातून सत्ता मिळवणाऱ्या स्वाभीमानी नेत्याची लेक आहे, तुमच्यावरही साहेबांनी हेच संस्कार केले आहे. त्यामुळे मी कुणाच्या दारात जाणार नाही, तुम्हालाही जाऊ देणार नाही. स्वाभीमानाची वज्रभूठ आवळून पुन्हा संघर्ष करणार, असे स्पष्ट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘त्या पक्ष सोडणार' या अफवा असल्याचे सांगत आपण भाजप सोडणार नसल्याचा मोठा खुलासा आज केला. 

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी दिनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी राज्यातील समर्थकांशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटामुळे गोपीनाथ गडावर येणार नाही हे स्पष्ट केल्यानंतर मी तुमच्याशी संवाद साधणार असल्याचे पंकजा यांनी जाहीर केले होते. त्यामुळे त्या काय बोलणार? कुठली भूमिका घेणार? एखादा मोठा निर्णय घेणार का? याकडे संपर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

विधान परिषदेसाठी प्रमुख दावेदार असतांना पक्षाने त्यांना डावलल्यामुळे त्या भाजप सोडणार, शिवसेनेत प्रवेश करणार अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. पण या सर्वा अफवा होत्या हे सांगत आपण भाजप सोडणार नाही, दिल्लीतील नेत्यांशी माझा संवाद असतो, अमित शहा माझे नेते आहेत हे जाहीर करत पंकजा यांनी भाजप सोडण्या बाबतच्या चर्चांना पुर्णविराम दिला.

परळीतील विजयाची जेवढी चर्चा झाली नाही, त्याहून कितीतरी अधिक माझ्या पराभवाची झाली. मी मात्र दुसऱ्या दिवशी पराभवातून बाहेर पडले, तुम्ही यातून बाहेर पडणार आहात की नाही? हा खरा प्रश्न आहे. माझ्या बाबतीत अनेक बातम्या पसरवल्या जातात. पंकजा मुंडे पक्ष सोडणार, या पक्षात प्रवेश करणार, तुम्ही कोण माझ भविष्य आणि पक्ष प्रवेशाचे मुहूर्त ठरवणारे असा सवालही पंकजा यांनी केला. भारतीय जनता पक्ष हा मुंडे साहेब, प्रमोद महाजन साहेबांनी मोठा केला आहे. गोपीनाथ गडावरील साहेबांचे स्मारक देखील याच भाजप पक्षाच्या कमळात साकारण्यात आले आहे. त्यामुळे मी पक्ष सोडून जाव यासाठीच अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप  पंकजा मुंडे यांनी केला.

विधान परिषद निवडणुकीत माझी लायकी असतांना मला डावलंल गेल. माझी दिल्ल्लीत नेत्यांशी चर्चा होत असते, अमित शहा माझे नेते आहेत, मी लवकरच त्यांना भेटून बोलणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आणि माझे ऋणानूबंध देखील चांगले आहेत. शरद पवार हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे राजकीय विरोधक असले तरी, त्यांच्याशी देखील माझा संवाद आहे. शेतीच्या प्रश्नावर अनेकदा मी त्यांच्याशी बोलत असते.

कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांशी माझे जिव्हाळ्याचे आणि राजकारणा पलीकडचे संबंध आहेत. त्यामुळे या अशा चर्चांना काही अर्थ नाही, पंकजा मुंडे कधी दगाबाज असूच शकत नाही. कुणाच्या दारात जाणार नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा केला. सध्या देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे मी दोन महिन्यापासून तुम्हाला भेटू शकले नाही. पण कोरोनाचे संकट दूर होताच मी तुमच्या भेटीला येणार आहे. सगळ्या महाराष्ट्रात जाणार असल्याची घोषणाही पंकजा यांनी यावेळी केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com