लातूरकडे आमचा विशेष ओढा; काॅंग्रेस-भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशानंतर जयंत पाटलांचे विधान.. - Our special inclination towards Latur; Statement of Jayant Patil after the entry of Congress-BJP office bearers .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

लातूरकडे आमचा विशेष ओढा; काॅंग्रेस-भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशानंतर जयंत पाटलांचे विधान..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

जनमानसाचा ओढा राष्ट्रवादीकडे आहे. पक्ष वाढविणे सोपे असते पण पक्षात आलेल्यांना योग्य सन्मान देणं ही मोठी जबाबदारी असते.

मुंबई ः  लोकांमधील कार्यकर्ते जेव्हा आपल्या पक्षात प्रवेश करतात तेव्हा आम्हाला मनापासून आनंद होतो. लातूर जिल्ह्याकडून राजकीय संस्कृती कशी सांभाळावी हे आम्ही शिकलो आहोत. त्यामुळे या जिल्ह्याकडे आमचा विशेष ओढा आहे.  निलंगा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद थोडी कमी पडत होती. (Our special inclination towards Latur; Statement of Jayant Patil after the entry of Congress-BJP office bearers)  ही ताकद वाढविण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे. धुमाळ यांच्या येण्याने या ताकदीत भर पडली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मांडले. 

पवारसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. यासोबतच जनमानसाचा ओढा राष्ट्रवादीकडे आहे. (Ncp State President Jayant Patil) पक्ष वाढविणे सोपे असते पण पक्षात आलेल्यांना योग्य सन्मान देणं ही मोठी जबाबदारी असते. पक्षात आलेल्यांना हा सन्मान नक्कीच दिला जाईल,असा विश्वासही जयंत पाटील यांनी दिला.  

संजय बनसोडे यांनीही पक्षप्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले. निलंगा मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करण्याची व येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी आता धुमाळ यांच्यावर आहे. यासाठी बूथ कमिटी रचनेवर लक्ष दिले तर हे यश नक्कीच आपले आहे, असे संजय बनसोडे यांनी सांगितले. 

यांनी केला प्रवेश..

लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ, माजी सदस्य प्रविण सुरवसे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अतुल पाटील, निलंगा येथील रहेमानिया तालीम संस्थेचे अध्यक्ष फारुख देशमुख, शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे सदस्य अनिलकुमार देवंग्रे, देवणीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष वैभव म्हेत्रे, वंचितचे बालाजी लवे, सचिन दोडके, युसुफ सय्यद, गुणवंतराव जाधव, संजय सावकार, बालाजीराव पाटील, सुधीर धुमाळ, विशाल धुमाळ आदींनी जाहीर प्रवेश केला. 

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष व आमदार बाबासाहेब पाटील, अलसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष डी. एन शेळके आदी उपस्थित होते.

हे ही वाचा ः कराडांना मंत्रीपद, पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख