उस्मानाबाद-कळंबचे आमदार दुसऱ्यांदा कोरोना पाॅझीटीव्ह, अख्ख्या कुटुंबाला झाली लागण

गेल्या काही दिवसामध्ये त्यांनी थेट कोरोना वार्डात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता.
Shivsena Mla kailas Ghadge Patil Again Corona Infected news
Shivsena Mla kailas Ghadge Patil Again Corona Infected news

उस्मानाबाद : उस्मानाबाद -कळंब मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास घाडगे पाटील यांना कोरोनाने दुसर्‍यांदा गाठले आहे. आज त्यांची टेस्ट केल्यानंतर अहवाल पाॅझिटिव्ह आला. गेल्यावर्षी त्यांना सप्टेंबर मध्ये कोरोनाची लागन झाली होती.

आमदार घाडगे पाटील यांच्या परिवारातील सगळ्याच सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात वडील बाळासाहेब पाटील व आई दोघांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. पत्नी व मुलगी, भावजय व पुतणी या सुध्दा बाधित असुन ते सर्व डाॅक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाईन झाले आहेत.

काही दिवसापुर्वी आमदाराचे बंधु अतिष पाटिल डिस्चार्ज घेऊन आले होते. आता एकाचवेळी घरातील सगळेच सदस्य पाॅझिटिव्ह आल्याने आमदार पाटील यांनीही चाचणी करुन घेतली तेव्हा तेही बाधित असल्याचे अहवालावरुन लक्षात आले.

गेल्या काही दिवसामध्ये त्यांनी थेट कोरोना वार्डात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. आज दिवसभर पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या दाैर्‍यातही ते सहभागी होते. प्रत्येक कार्यक्रमात ते सोबतच होते.

काही दिवसापुर्वीच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या परिवारातले सगळेच सदस्य पाॅझिटिव्ह आले होते. आता ते यातुन बरे झाल्यानंतर आमदार घाडगे पाटीलही बाधित झाले आहेत.

गरिबांना बाजारातील महागडी लस परवडणार नाही, मोफतच द्या..

हिंगोली : राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर राज्यात व जिल्ह्यात लसीकरण थांबले होते. आता नव्याने लसीचा पुरवठा झाल्याने सर्वसमान्यांना लस मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या १ मे पासून देशातील १८ वर्षाच्या वरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

आता ही लस मोफत मिळणार की मग त्यासाठी पैसे मोजावे लागणार यावरून वेगवेळ्या चर्चा सुरू आहेत. बाजारात मिळणारी लस ही महाग असल्यामुळे ती गरीबांना परवडणार नाही, तेव्हा केंद्र व राज्य सरकारने ती मोफतच द्यावी, अशी मागणी हिगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.

जिल्ह्यातील कोरोना व आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी आलेले असतांना त्यांनी हे मत व्यक्त केले. राज्यात अठरा वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये कलगितुरा रंगला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com