बीडमधून ७३ वर्षात केंद्रात तिघांना संधी; आता मंत्रीपदासाठी डॉ. मुंडेंची चर्चा.. - Opportunity for three from Beed in 73 years; Now for the ministerial post. Discussion of Munde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

बीडमधून ७३ वर्षात केंद्रात तिघांना संधी; आता मंत्रीपदासाठी डॉ. मुंडेंची चर्चा..

दत्ता देशमुख
सोमवार, 14 जून 2021

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे, जेष्ठ नेते बबनराव ढाकणे व जयसिंगराव गायकवाड यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळात काम केले.

बीड : मागच्या ७३ वर्षांच्या काळात केंद्रीय मंत्रीमंडळात यापूर्वी जिल्ह्यातील तिघांना संधी मिळालेली आहे. आता खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचेही नाव केंद्रीय मंत्रीपदासाठी चर्चेत आले आहे. (Opportunity for three from Beed in 73 years; Now for the ministerial post. Discussion of Munde ) सर्वप्रथम नगर जिल्ह्याचे रहिवाशी पण बीड लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले बबनराव ढाकणे यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद भेटले. तर, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना ग्रामविकास सारखे महत्वाचे खाते मिळाले. परंतु, शपथविधीनंतर काही दिवसांनीच दुर्दैवी त्यांचे निधन झाले.

१८८९ च्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदार संघातून नगर जिल्ह्याचे रहिवाशी असलेले बबनराव ढाकणे जनता दलाकडून रिंगणात उतरले. मातब्बर नेत्या दिवंगत केशरबाई क्षीरसागर काँग्रेसच्या उमेदवार होत्या. (Ex. Central Minister Babanrao Dhakne) परंतु, ढाकणे जायंट किलर ठरले आणि त्यांनी केशरबाई क्षीरसागर यांचा पराभव केला. पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात बबनराव ढाकणे यांना उर्जा आणि खनिकर्म ह्या खात्याचे मंत्रीपद भेटले.

ढाकणे नगर जिल्ह्याचे असले तरी बीड लोकसभेतून ते विजयी झालेले होते. त्यामुळे किमान त्यांच्या रुपाने त्यावेळी तब्बल ४२ वर्षांनी जिल्ह्याला केंद्रात मंत्रीपद मिळाले होते. (Ex.Minister Jaysingrao Gaikwad)  नंतर भाजपकडून विजयी झालेले जयसिंगराव गायकवाड यांनाही केंद्रात मानवसंसाधन या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. ((Ex.Minister Gopinath Munde)  पुढे २००९ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी राज्याच्या राजकारणातून केंद्रीय राजकारणात प्रवेश केला.

परंतु, त्यावेळी केंद्रात काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. त्यांना लोकलेखा समितीचे अध्यक्षपदही मिळाले. (Bjp Mp Dr. Pritam Munde) पुढच्या २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा त्यांनी मोठ्या मतांनी विजय मिळविला आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये ग्रामविकास हे महत्वाचे खातेही मिळाले. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा कन्या डॉ. प्रितम मुंडे विक्रमी मतांनी बीड लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्या. त्यावेळेही डॉ. मुंडेंना मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी समर्थकांची आशा होती. परंतु, डॉ. मुंडे राजकारणातच त्यावेळी नवख्या होत्या. आता सहा वर्षांपासून त्या राजकारणात सक्रीय आहेत. उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉ. मुंडेंनी संसदेच्या अधिवेशनांमध्ये अनेक मुद्द्यांवर मते मांडलेली आहेत.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या भगीनी अशी त्यांची आता केंद्रात दुहेरी ओळखही आहे. सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदलाच्या चर्चेत डॉ. प्रितम मुंडे यांचेही नाव घेतले जात आहे. त्यामुळे आता चौथ्यांदा बीडला केंद्रीय मंत्रीमंडळात डॉ. मुंडेंची वर्णी लागते का? हे पहावे लागेल.

हे ही वाचा ः भाजप श्रीमंतांचा पक्ष, पैशाची ने-आण करण्यासाठी विमाने अन् हेलिकाॅप्टरचा वापर..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख