`धनुष्यबाणापासून फक्त कौरवांनाच धोका`; राणापाटलांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर..

शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिले आहे.
mp omrajenibalkar- Ranapatil- Kailas Patil news osmanabad
mp omrajenibalkar- Ranapatil- Kailas Patil news osmanabad

उस्मानाबाद ः तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राणे यांच्या अटकेचा निषेध करतांना शिवसेनेची तुलना थेट तालीबानशी केली. आपल्या अधिकृत ट्विवटर हॅन्डलवरून त्यांनी `जगाला तालीबानपासून आणि महाराष्ट्राला धनुष्यबाणापासून धोका`, असल्याचे म्हटले. (`Only Kauravas are in danger from bows and arrows`; Shiv Sena's reply to Ranapatil) त्याला आता शिवसेनेकडून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी देखील जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

या दोघांनीही ट्विट करत `धनुष्यबाण हे अर्जुनाचे अस्त्र आहे, त्यापासून फक्त कौरवांनाच धोका! असा सूचक इशारा दिला आहे. राज्यात तर १०५ कौरव आहेत, त्याला फक्त धनुष्यबाणच रोखणार.. असे देखील या दोघांच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. (Shivsena Mp Omprakash Rajenimbalkar, Osmanabad)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेना-भाजपमध्ये ठिकठिकाणी संघर्ष झडत आहे. (Shivsena Mla Kailas Patil) रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू असतांनाच आता सोशल मिडियावर देखील या दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेच नाही, तर लोकप्रतिनिधी देखील एकमेकांना भिडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल `कानाखाली लावली असती`, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केले होते. (Chief Minister Uddhav Thackeray) त्यांच्या या विधानमुळे शिवसेनेत प्रचंड संताप पसरला आणि त्याचे पडसाद राज्यभरात राणे यांच्या विरोधात आंदोलन, जोडे मारो, पुतळ्याचे दहन आणि घोषणाबाजीच्या रुपाने उमटले.

सरकारने देखील राणे यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटकही केली. त्यानंतर तर राज्यातील वातावरण अधिकच चिघळले. राणे यांच्या समर्थनार्थ भाजपचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. रस्त्यावरची ही लढाई आता सोशल मिडियावर देखील सुरू झाली आहे.

भाजपचे  आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध करतांना शिवसेनेवर टीका करणारे एक ट्विट केले. या ट्विटमध्ये राणापाटील यांनी शिवसेनेची तुलना थेट तालीबान्यांशी केली. आता त्यांच्या ट्विटला शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com