एका सहीने मुस्लिम समाजाला आरक्षण मिळू शकते- अबू आझमी

याच अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या एका सहीने आपण मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देऊ शकतो, या संदर्भात तातडीने निर्णय घ्या, अशी आमदार अबू आझमी यांनी केली.
Samajwadi Party Mla Abu Azami Statement on Muslim Reservation News
Samajwadi Party Mla Abu Azami Statement on Muslim Reservation News

औरंगाबाद ः उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिलेली आहे, तरी देखील २२ टक्के अल्पसंख्याक समाजावर अन्याय केला जात आहे. आता आपले सरकार आहे, याच अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या एका सहीने आपण मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देऊ शकतो, या संदर्भात तातडीने निर्णय घ्या, अशी आमदार अबू आझमी यांनी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणात मुस्लीम आरक्षणाचा उल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत अबू आझमी यांनी उच्च न्यायलयाने मान्य केलेले मुस्लिम आरक्षण याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. अबू आझमी म्हणाले, मराठा आरक्षण, ओबीसींचे प्रश्न यावर सगळेच बोलतात, पण मुस्लिम आरक्षणावर कुणीच बोलत नाही, याबद्दल खेद वाटतो.

बिहार सारख्या राज्यात जिथे नितीश कुमार हे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री बनले आहेत, तिथे एनआरसी, सीएएचा कायदा आम्ही आमच्या राज्यात लागू करणार नाही, असा निर्णय केला जातो. मग महाराष्ट्रात आम्ही असा निर्णय का घेत नाही? बिहार प्रमाणे महाराष्ट्रात देखील आम्ही एनआरसी, सीएए लागू करणार नाही, या संदर्भातला निर्णय घेऊन मुस्लिम समाजाच्या मनातील भिती नाहीसी करावी, असे आवाहन आझमी यांनी केले.

सगळी कामे सोडा, लोकांना जगवा..

कोरोना काळात खाजगी रुग्णालयांकडून सर्वसामान्यांची मोठी लूट होते याचे उदाहरण आझमी यांनी सभागृहात सांगितले. आपल्या एका कार्यकर्त्याला कोरोना झाला तर मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयांने त्याला ४३ लाखांचे बील आकारले. मी स्वःत ९ लाखांची मदत त्याला केली. २० लाख रुपये भरल्यानंतर देखील हाॅस्पीटलकडून २३ लाखांची मागणी केली जात आहे. सर्वसामान्य माणसाने एवढा पैसा आणायचा कुठून.

सरकारने खाजगी रुग्णालयातील बीलांची तपासणी करण्यासाठी नेमलेले अधिकारीच हातमिळवणी करून नागरिकांची लूट करत असल्याचे आपण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. कोरोना अजूनही संपलेला नाही, सर्वसामान्यांची लूट होऊ नये, यासाठी सरकारने आतापासूनच ठोस पावले उचलावीत, अशी मागणी देखील आझमी यांनी केली. कोरोनामध्ये सगळी कामे सोडा, आधी लोकांना जगवा. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा, असे आवाहन देखील आझमी यांनी केले.

Edited By : Jagdish Pansaer

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com