करुणा मुंडेची आजची रात्र पोलीस कोठडीतच.. 

विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादिवरुन करुना व अरुण मोरे (मुंबई) यांच्यावर भादवि १४२/ २०२१/ ३०७/ ३२३/ ५०४/ ५०६-३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
करुणा मुंडेची आजची रात्र पोलीस कोठडीतच.. 
Karuna Munde News Parali

बीडः परळी येथे पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करूणा मुंडे यांच्यावर पोलिसांनी अट्राॅसिटीसह महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. करुना शर्मा व मोरे (दोघेही रा. मुंबई) यांच्या विरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी या दोघांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

परळी शहरात आज दिवसभर तणावाचे वातावरण होते. करुणा मुंडे यांनी दोन दिवसांपुर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत परळीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत आपण आपले पती व इतरांच्या विरोधात अनेक पुरावे सादर करून काही गोष्टींचा व षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते.

त्यानूसार करूणा मुंडे या आज दुपारी परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शन घेऊन जात असतांनाच त्यांची मंदिर परिसरात काही महिलाशी बाचाबाची झाली. यावेळी करूना मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न  केल्याची तक्रार एका महिलेने शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानूसार पोलिसांनी करुणा मुंडे यांच्याविरोधात अॅट्राॅसिटी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

करुणा यांना पोलिसा ठाण्यात नेत असतांनाच पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली. तेव्हा कारच्या मागच्या बाजूला पोलिसांना एक गावठी पिस्तुल देखील आढळून आले. शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, करुना या  वैद्यनाथ मंदिर परिसरात पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या होत्या.

यावेळी विशाखा रविकांत घाडगे व गुड्डी तांबोळी या महिलेबरोबर त्यांची बाचाबाची झाली. करुना या दोघींना तुम्ही पैसे घेऊन इथे आला आहात, म्हणत गुड्डी तांबोळी यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.

गुड्डी तांबोळी या महिलेस करूणा यांनी चाकू मारून जखमी केले. त्यानंतर या महिलेस उपचारासाठी आंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादिवरुन करुना व अरुण मोरे (मुंबई) यांच्यावर भादवि १४२/ २०२१/ ३०७/ ३२३/ ५०४/ ५०६-३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढी तपास पोलीस उपअधिक्षक सुनील जायभाय हे करत आहेत.  

दरम्यान करुना व मोरे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी (ता.०६)आंबेजोगाई येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, करुना यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in